लाहोर- पाकिस्तानी तुरुंगात दोन दिवसांपूर्वी भारतीय कैदी कृपाल सिंहचा मृत्यू झाला. याबाबत भारताने पाक सरकारला उत्तर मागितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने कृपाल यांच्या मृत्यूचे कारण व ऑफिशयल इन्फॉर्मेशनमध्ये मागितले आहे. शिवाय पाककडूनच शवविच्छेदनाचा अहवाल पाठवावा असे सरकारने म्हटले आहे. सरबजीत सिंह याची बहीण दलबीर कौर हिने कृपालचा मृत्यू ही हत्या असल्याचे म्हटले आहे.
पाकने हार्ट अटॅकचे कारण सांगितले....
- परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी बुधवारी माहिती दिली की, इस्लामाबादमध्ये
या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
- शिवाय कृपाल सिंह याचा मृतदेह लवकरात लवकर भारतात पाठवण्याची तयारी करण्यासंदर्भातही सांगितले आहे.
- कृपाल याचे कुटुंबिय आणि सरबजीत सिंह याची बहीण दलबीर याप्रकरणी सुषमा स्वराज यांना भेटणार आहेत.
- 23 वर्षांपासून पाकमध्ये कैद असलेल्या कृपाल सिंहचे सोमवारी निधन झाले.
- तुरुंग अधिका-यांच्या माहितीनुसार, कृपाल यांचे निधन सोमवारी सकाळी तुरुंगाच्या हॉस्पिटलमध्ये झाले.
- पाकिस्तानने या मृत्यूचे कारण हृदय विकार सांगितले आहे.
1993 मध्ये मिळाली होती जन्मठेप....
- 55 वर्षीय कृपालला पाक सिक्युरिटी एजेंसीने 1991 मध्ये अटक केली होती.
- त्याच्यावर हेरगिरी आणि 1990 मध्ये फैसलाबाद रेल्वे स्टेशनवर ब्लास्ट करण्याचा आरोप होता.
- 1993 मध्ये दहशतवाद विरोधी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
- याच तुरुंगात सरबजीत सिंह हा देखिल बंद होता.
सरबजीत सिंहच्या बहिणीने काय म्हटले....
- सरबजीत सिंहची बहीण दलबीर कौर म्हणाली, "कृपाल सिंहची हत्या झाली आहे. सरबजीतसारखे त्याचेही हाल झाले आहेत."
- भारत सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
- कृपाल यांच्या भावाने मृतदेहासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.
- 2013 मध्ये सरबजीतला कोट लखपत तुरुंगात कैद्यांनी मारहाण केली होती. यामुळे त्याचा मृत्यू झाला.
कुटुंबियांना पाठवले दोन पत्र....
- याच वर्षी कृपाल सिंहकडून त्याच्या कुटुंबियांना दोन पत्र मिळाले होते.
- हे दोन्ही पत्र उर्दू भाषेत लिहीलेले होते.
- पाकच्या तुरुगाची वाईट स्थिती आणि इतर कैद्यांचा उल्लेख त्याने केला होता.