आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल पाकला अमान्य; पाकिस्तानी माध्यमांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना कथित हेरगिरी आणि देशविरोधी कारवायांमध्ये दोषी मानत फाशीची शिक्षा सुनावली आहे. (फाईल) - Divya Marathi
पाकच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना कथित हेरगिरी आणि देशविरोधी कारवायांमध्ये दोषी मानत फाशीची शिक्षा सुनावली आहे. (फाईल)
इस्लामाबाद - कुलभूषण जाधव यांच्याबाबत इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजे) ने दिलेला आदेश पाकिस्तान मान्य करण्यास नकार देऊ शकतो. पाकिस्तानी माध्यमांनी शनिवारी यासंदर्भातील वृत्त जाहीर करून हा दावा केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने भारतीय नागरिक जाधव यांना सुनावलेली फाशी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगित केली आहे. आयसीजे 15 मे रोजी यावर अंतिम निकाल देणार आहे.
 
पाकिस्तानचे महान्यायवादी म्हणाले...
पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पाकिस्तानचे अटॉर्नी जनरल अश्तर औसफ अली यांनी जाधव प्रकरणी माहिती दिली. हा मुद्दा पाकिस्तानच्या राष्ट्रीय स्थैर्याशी संबंधित आहे. त्यामुळे, ते आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. 
 
पाकच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना कथित हेरगिरी आणि देशविरोधी कारवायांमध्ये दोषी मानत फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले होते. भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर ते इराणमध्ये व्यापारासाठी गेले होते. पाकिस्तानच्या आरोपानुसार, जाधव यांना बलुचिस्तानातून 3 मार्च 2016 रोजी अटक करण्यात आली होती. 
 
बातम्या आणखी आहेत...