आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय कैदी किरपालचा पाक तुरुंगात मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानातील कोट लखपत तुरुंगात सोमवारी सकाळी भारतीय कैदी किरपाल सिंगचा (वय ५०) रहस्यमय मृत्यू झाला आहे. त्याला हेरगिरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती व त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

किरपाल सिंग १९९२ मध्ये वाघा बॉर्डर ओलांडून चुकून पाकिस्तानात पोहोचला होता. गेल्या २० वर्षांपासून तो कोटा लखपत तुरुंगात होता. तुरुंगाधिकाऱ्याने सांगितले की, किरपाल सिंग सोमवारी सकाळी त्याच्या कोठडीत मृतावस्थेत आढळला. त्याचा मृतदेह लाहोरच्या जिना हॉस्पिटलमध्ये पाठवणत आला आहे. याप्रकरणी इतर कैद्याचे जबाब नोंदवण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार त्याने सहकारी कैद्यांकडे त्याच्या छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. परंतु त्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला. किरपाल गुरुदासपूरचा राहणारा होता. त्याला लाहोर उच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटाच्या आरोपावरून निर्दोष मुक्त केले होते. परंतु मृत्यूची शिक्षा रद्द केली नव्हती.