आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK दहशतवाद्यांच्या यादीत सईदचा समावेश, आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाईची भारताची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाब प्रांताच्या सरकारने दोन दिवसांपूर्वीच सईदचे नाव अॅँटि टेररिझम अॅक्ट (ATA) च्या 4th शेड्यूल मध्ये दाखल केले. - फाइल - Divya Marathi
पंजाब प्रांताच्या सरकारने दोन दिवसांपूर्वीच सईदचे नाव अॅँटि टेररिझम अॅक्ट (ATA) च्या 4th शेड्यूल मध्ये दाखल केले. - फाइल
नवी दिल्ली - मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांचा पाकिस्तानने प्रथमच दहशतवाद्यांच्या यादीत टाकले आहे. त्यावर भारताने आनंद व्यक्त केला आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या एका वक्तव्यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सईदच्या विरोधात झालेली ही कारवाई दहशतवाद थांबवण्यासाठी आणि शांततेसाठी शेजारी देशाने उचललेले पहिले पाऊल आहे. सईदच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सईदच्या पाकिस्तानातून बाहेर जाण्यावर बंदी लादण्यात आली आहे. तसेच त्याना नजरकैदेतही ठेवण्यात आले. 

सईद आंतरराष्ट्रीय दहशतवादी 
- परराष्ट्र मं६ालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप म्हणाले, हाफीज सईद हा एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. मुंबई हल्ल्यांचा मास्टरमाइंड आहे. तो पाकिस्तानातून लश्कर आणि जमात उद दावाच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया घडवतो. 
- सईद आणि त्याच्या ऑर्गनायझेशन्सच्या सहकाऱ्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यासंदर्भात शेजारी देशाने पहिले पाऊल उचलले आहे. दहशतवाद रोकण्यासाठी आणि परिसरात शांतता टिकण्यासाठी ते महत्त्वाचे ठरेल. 

आतापर्यंत काय झाले?
- अमेरिकेत ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतर पाकिस्तानने सईदसह त्याची संघटना 'जमात-उद-दावा' आणि 'फलाह-ए-इन्सानियत'च्या 37 अॅक्टिव्ह मेंबर्सना देशाबाहेर जाण्यास बंदी घातली होती. 
- गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने सईदसह त्यांच्या 4 सहकाऱ्यांना नजरकैदेत ठेवले होते. 
- 18 फेब्रुवारीला प्रथमच पाकिस्तानने हाफीज सईद हा दहशतवादी असल्याचे मान्य केले आहे. 
- पंजाब प्रांताच्या सरकारने सईद आणि त्याच्या एका जवळचा सहकारी काजी काशिफ या दोघांची नावे अँटी-टेररिझम अॅक्ट (ATA)च्या 4th शेड्यूलमध्ये सहभागी करण्यात आले. 

कोण आहे हाफीज सईद?
- दहशतवागी हाफीज सईद हा जमात-उद-दावा आणि लश्करचा म्होरक्या आहे. 
- नुकतेच झालेले 8 दहशतवादी हल्ले आणि 100 जणांचे प्राण गेल्यानंतर पाक सरकारने त्याच्या विरोधात ही कारवाई केली. 
- नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबई अटॅकनंतरही सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले. तो भारतातील हल्ल्यांचाही मास्टरमाइंड आहे. पण पाकिस्तान कोर्टाने त्याने 2009 मध्ये निर्दोष सोडले होते. 
- सईदवर अमेरिकेने एक कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...