आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिलिपाइन्समध्ये शीख दांपत्यावर भररस्त्यात गोळ्या झाडल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनिला - फिलिपाइन्समध्ये भारतीय शीख दांपत्यावर भररस्त्यात गोळ्या झाडून त्यांना ठार करण्यात आले. ४५ वर्षीय भागवतसिंग भुट्टर व त्यांची ३६ वर्षीय पत्नी जसविंदर कौर यांच्यावर बाइकस्वार युवकांनी गोळ्या झाडल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केले. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन संशयित मार्विन मॅगडांग व रोडोल्फो गुमाते यांना अटक केली. यांच्या हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. फिलिपाइन्समध्ये भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्टमध्ये २६ वर्षीय भारतीय व्यक्तीची हत्या झाली होती.
बातम्या आणखी आहेत...