आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान : कब्रस्तानातून काढून परत केला भारतीय महिलेचा मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सियालकोट - पाकिस्तानी रेंजर्सनी एक भारतीय महिला आणि तिच्या चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह बीएसएफला सोपवला. दोन्ही मृतदेह चिनाब नदीतून वाहात पाकिस्तानात पोहोचले होते. तिथे त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला होता. जेव्हा बीएसएफने मृतदेहांची मागणी केली त्यानतंर कबर उकरून ते काढण्यात आले. महिला राजौरी जिल्ह्यातील कलसियां गावची रहिवासी होती.
पाकिस्तानच्या चिनाब रेंजर्सच्या सेक्टर कमांडर ब्रिगेडियर वसीम इनायत यांनी शहीद पोस्टवर शनिवारी रात्री 8.30 वाजता भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडे मृतदेह सुपूर्द केले. ही पोस्ट सियालकोट जिल्ह्याला लागून आहे.
अखनूर येथे महिलेने नदीत घेतली होती उडी
जम्मू जिल्ह्यातील अखनूर येथे 28 एप्रिल रोजी अनिता चौधरी या महिलेने चार वर्षांचा मुलगा अर्णवसह चिनाब नदीत उडी घेतली होती. ती गर्भवती होती. आत्महत्येपूर्वी तिने बहिणीला फोन करुन सासरचे लोक त्रास देत असल्याचे सांगितले होते. महिलेच्या आत्महत्येनंतर तिचा पती सुनील चौधरीला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे.
पाकिस्तानी मीडियात प्रकाशित वृत्तानूसार, मराला हायड्रो इंजिनिअरिंग प्रॉजेक्टजवळ स्थानिकांना एका 28 वर्षीय महिलेचा आणि एका लहान मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी जवळच्या कब्रस्तानमध्ये दफनविधी केला. चिनाब रेंजर्सच्या माहितीनूसार बीएसएफने मृतदेहांची मागणी केल्यानंतर त्यांनी कब्रस्तानातून काढून ते परत केले.
बातम्या आणखी आहेत...