आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीतून गुंतागुंत - सरताज अझीझ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारताने अलीकडेच केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे पाकिस्तानची पोटदुखी वाढली आहे. सुरक्षेचे ‘खोटे कारण’ पुढे केले जात आहे. उलट चाचणी केल्यामुळे ‘अनपेक्षित गुंतागुंत ’ वाढली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटले आहे. सिनेटच्या सदस्यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणातील अपयशावर केलेल्या टीकेनंतर अझीझ यांनी हे वक्तव्य केले.

१५ मे रोजी भारताने देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. आेडिशाच्या किनारपट्टीवर ही चाचणी झाली होती. ही कृती अत्यंत चिंताजनक असल्याचा दावा अझिझ यांनी केला आहे.भारताच्या शेजारी राष्ट्रांबद्दलच्या धोरणाशी ही कृती अगदी विसंगत आहे, असा आरोप अझीझ यांनी केला. अशा प्रकारचे क्षेपणास्त्राची निर्मिती करून भारताने सुरक्षेचे कारण पुढे केले शांततापूर्ण मार्गाने शेजाऱ्यांसोबत राहण्याच्या धाेरणाचे उल्लंघन होत आहे.

मुत्सद्देगिरीत पीछेहाट
भारताने एनएसजीमध्ये सदस्यत्व मिळवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सेऊलच्या बैठकीत ते दिसून येईल. एवढेच नव्हे तर भारताने आमचे शेजारी राष्ट्र असलेले अफगाणिस्तान, इराण यांनाही आपल्या बाजूने घेतले आहे. त्यांची मुत्सद्देगिरी आमच्यापेक्षा सरस ठरली आहे. मुत्सद्देगिरीतील पराभवामुळेच हे झाल्याचे सिनेटर मुशाहिद हुसैन यांनी म्हटले आहे. सिनेटर फारहतुल्ला बाबर यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला जबाबदारी धरले.
बातम्या आणखी आहेत...