आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताकडून धोका, पण अमेरिकेचा कानाडोळा; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री बरळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारताच्या विरोधातील भूमिका सोडण्यास पाकिस्तान तयार नाही.  त्यामुळेच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी भारताकडून धोका असतानाही अमेरिका त्याकडे कानाडोळा करत असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पाकिस्तान-अमेरिकेतील संबंधात आणखी तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरले आहे, अशी टीका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्यावर खान यांनी देशाची भूमिका मांडली. ते म्हणाले, अमेरिकेचे सर्वप्रकारे समाधान करणे पाकिस्तानला जमणार नाही. आम्ही पुरावे देऊ आणि तर्काच्या पातळीवर आमची बाजू मांडू. आमची बाजू निश्चितपणे मांडू. मात्र एखाद्याचे समाधान करणे आम्हाला जमणार नाही. सरकारने वारंवार अमेरिकेसोबत जुळवून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. अमेरिकेसोबतचे द्विपक्षीय संबंध सुरळीत करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न केले. परंतु तसे घडत नाही. खरे तर अशा संबंधासाठी दोन्ही बाजूने मोकळ्या वातावरणात चर्चा व्हायला हवी. आपसातील मतभेदांवर विचार-विनिमय व्हायला हवा. अफगाणिस्तान आणि इतर प्रादेशिक प्रश्नी तसे दिसून येईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे खान म्हणाले. 
 
सर्वकाही ठाऊक असतानाही शांत
भारताकडून आम्हाला किती आणि कशा प्रकारचा धोका आहे, याची अमेरिकेला पुरेपूर जाणीव आहे. परंतु रणनीतीच्या पातळीवरील हितसंबंध लक्षात घेऊन अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पाकिस्तानने वारंवार त्याबाबत अमेरिकेकडे चिंता व्यक्त केली होती. परंतु ऐकून घेतले जात नाही. वास्तविक ही परिस्थिती गंभीर आहे. अमेरिका अशा प्रकारे दुर्लक्ष करू शकत नाही, असे खान म्हणाले.
 
बातम्या आणखी आहेत...