आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे भारत-पाक सीमा अन् कुठे या देशाची, पायी-सायकलने भारतात येतात या देशाचे लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारमधील पूर्व चंपारण जिल्‍ह्यातील रक्‍सोल हे गाव भारत-नेपाळची सीमा रेषा आहे. - Divya Marathi
बिहारमधील पूर्व चंपारण जिल्‍ह्यातील रक्‍सोल हे गाव भारत-नेपाळची सीमा रेषा आहे.
इंटरनॅशनल डेस्क- भारताचा जवान चंदू चव्हाणला पाकिस्तानने भारताच्या हवाली केले आहे. गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर चुकून भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानाच्या हद्दीत महाराष्ट्रातील जळगावचा जवान चंदू चव्हाण गेला होता. त्यानंतर त्याला पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. तसेच मागील तीन-चार महिन्यात पाक लष्कराने चंदूचा आतोनात छळ केल्याचे आता पुढे येत आहे. अंधा-या कोठडीत त्याला ठेवले जात होते व त्याला पुरेसे अन्नही दिले नव्हते. शिवाय त्याला मारहाण केली जात असल्याचे समोर आले आहे. चुकून दुस-या देशाची सीमा ओलांडली असल्याने चंदूला हे भोगावे लागले. भारत-पाक यांच्यातील संबंध चांगले नसल्यानेच हे सारे घडल्याचे स्पष्ट आहे. पण भारताच्या इतर देशांच्या सीमेवर अगदी हलके फुलके व सामान्य वातावरण आहे. आज त्यावरच आपण प्रकाशझोत टाकणार आहोत.

एक घर भारतात तर शेजारचे नेपाळमध्‍ये-
 
भारताच्‍या काही राज्‍यांना नेपाळची सीमा लागलेली आहे. त्‍यापैकी बिहारही एक आहे. उत्‍तर बिहारच्‍या काही जिल्‍ह्यांत नेपाळची सीमा लागते. सीमेच्‍या अलीकडे आणि पलीकडे पाहिले तर एकच गाव दिसते. केवळ या ठिकाणी असलेल्‍या कमानीवरील बोर्डमध्‍ये हे दोन वेगवेगळे देश असल्‍याचे लक्षात येते. सीमेपलीकडील नागरिक अगदी सहजतेने पायी-पायी किंवा सायकलने बाजार करण्‍यासाठी भारतात येतात. भारतातील नागरिकही तिकडे जातात. त्‍यांना कधी पासपोर्ट किंवा व्हिसाची आवश्‍यकता भासत नाही. येथील आणखी एक विशेष म्‍हणजे यातील काही घरांच्‍या शेजारीच असलेली अन्‍य घरे नेपाळमध्‍ये येतात. म्‍हणजे दोन सख्‍खे शेजारी पण त्‍यांचा देश, नागरिकता वेगवेळी आहे. थंडीच्‍या दिवसात तर दोन्‍ही देशातील काही नागरिक एकत्र येत निवांत शेकोटीजवळ बसतात.
 
कस्टम चेक पोस्ट-
 
दोन्‍ही देशातील नागरिकांना एकमेकांच्‍या देशात येण्‍याजाण्‍यासाठी कुठलीही सरकारी परवानगी घ्‍यावी लागत नाही. परंतु, या ठिकाणी दोन्‍ही देशांचे कस्टम चेक पोस्ट आहे. त्‍यामाध्‍यमातून सैन्‍य दलाचे जवान, पोलिस कर्मचारी येणा-या जाणा-यावर लक्ष ठेवतात. प्रसंगी संशयितांची तपासणी करतात.
 
सीमेवरच आहेत दुकाने-
 
या सीमेवरच अलीकडून आणि पलीकडून तेथील मुख्‍य बाजारपेठ आहे. या ठिकाणी औषधी, किराणा, इलेक्‍ट्रानिक अशी अनेक दुकाने आहेत. दोन्‍ही देशातील नागरिक सहजतेने खरेदीसाठी एकमेकांच्‍या देशात जातात येतात. अनेकांचे जवळचे नातेवाईक परराष्‍ट्रात म्‍हणजे नेपाळमध्‍ये हाकेच्‍या अंतरावर राहतात.
 
काही शेतजमिनी दुस-या देशात-
 
दोन्ही सीमा भागातील गावांमध्ये लग्नकार्येही होत असतात. काहींच्या जमिनी नेपाळमध्ये आणि नेपाळमधील काहींच्‍या भारतात असल्याने ते रोज शेती करण्यासाठी जातात-येतात.
 
मधेशी आंदोलनामुळे सीमेवर गार्ड-
 
बिहारमधील पूर्व चंपारणमधील जिल्‍ह्यातील रक्‍सौल हे गाव भारत-नेपाळची सीमा रेषा आहे. गेल्या वर्षी नेपाळमध्‍ये नवीन संविधान लागू झाले. त्‍यामुळे नेपाळमधील मधेशी समुदायाने (मूळ बिहारी-यूपी लोक) यांनी आपल्‍याही योग्‍य प्रतिनिधित्‍व द्यावे, या मागणीसाठी या सीमेवर आंदोलन केले. त्‍याला दडपून टाकण्‍यासाठी नेपाळी पोलिसांनी गोळीबार केला. यात एक बिहारी युवक ठार झाला होता. या आंदोलनामुळे या सीमेवर अलीकडच्या काळात सुरक्षा थोडी टाईट केली आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा भारत-नेपाळ सीमेवरील काही निवडक फोटोज....
बातम्या आणखी आहेत...