आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1965 War: आजच्याच दिवशी पाकच्या 30 हजार सैनिकांनी काश्मिरात केली होती घुसखोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - 5 ऑगस्ट 1965 रोजी पाकिस्तान लष्कराच्या सुमारे 30  हजार जवानांनी काश्मिरी वेश परिधान करत एलओसी पार केली होती. तसेच काश्मिरच्या विविध भागात ते पसरले. दरम्यानच्या काळात स्थानिक लोकांकडून भारतीय लष्कराला याची माहिती मिळाली. अखेर 15 ऑगस्ट 1965 रोजी भारतीय लष्कराला ते पाकिस्तानचे अधिकृत जवान असल्याचे कळाले. यानंतर भारत-पाकिस्तान युद्धाला ख-या अर्थाने सुरुवात झाली. पुढे हे युद्ध सप्टेंबरअखेरपर्यंत चालले. या युद्धात भारताने बाजी मारली. पण या युद्धात भारताचे अंदाजे तीन हजार जवान शहीद झाले. तर पाकिस्तानचे चार हजार सैनिक मारले गेले. या युद्धात नौदलाची महत्त्वाची भूमिका... 
 
- 1965 च्या भारत-पाकिस्तान युध्‍दात भारतीय नौदलाने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. 
- 7 सप्टेंबर 1965 रोजी कमांडार एस. एम.अनवर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी नौदलाने द्वारका येथील नौदलाच्या रडार केंद्रावर बॉम्ब वर्षाव केला. 
- रडार स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा संसदेतही गाजला आणि यामुळे संरक्षण अर्थसंकल्पात 35 कोटी रुपयांपासून वाढून 115 कोटी रुपये करण्‍यात आला. 
- पाकिस्तानी सूत्रांनुसार, पाकिस्तानी नौदलाची एक पाणबुडी पीएनएस गाझीने भारतीय नौदलाचे विमान वाहतूक जहाज आयएनएस विक्रांतला पूर्ण युध्‍दात मुंबईत घेरुन ठेवले होते. 
- भारतीय सूत्रांनी दावा केला होता, की भारत पाकिस्तानसोबत नौदलाच्या आघाडीवर युध्‍द करु इच्छित नाही आणि ते जमिनी युध्‍दापर्यंत सीमित करु इच्छित होता.
 
पाकने हवाईतळात केली होती घुसखोरी-
 
- वास्तविक पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हवाईतळात घुसखोरी केली होती. पाकने भारताचे तळ उद्ध्‍वस्त करण्‍यासाठी अनेक गुप्त मोहिमा चालवल्या. 
- चीफ ऑफ पाक आर्मी स्टाफ जनरल मोहम्मद मूसानुसार, सात सप्टेंबर 1965 रोजी विशेष सर्व्हिसेस ग्रुपच्या कमांडो पॅराशूटच्या माध्‍यमातून भारतीय भागात घुसखोरी केली. 
- जवळजवळ 135 कमांडो भारताच्या तीन हवाईतळावर (हलवारा, पठाणकोट आणि आदमपूर) उतरले. मात्र पा‍क सैन्याला या चुकीची भारी किंमत मोजावी लागली होती. 
- पाकिस्तानचे फक्त 22 कमांडो आपल्या देशात परतू शकले. 93 पाकिस्तान सैनिकांना पकडण्‍यात आले. यात एक ऑपरेशनचे कमांडर मेजर खालिद बट्टही सामील होते. 
- पाकिस्तानी सैन्याच्या अपयशामागे त्यांची अपुरी तयारी सांगितले जाते.
 
भारताने असे दिले प्रत्युत्तर-
 
- इतके मोठे अपयश मिळवूनही पाकच्या कमांडो मिशनमुळे भारतीय सैन्याचे काही ऑपरेशन विस्कळित झाले. 
- भारतीय सैन्याच्या 14 व्या इन्फँट्री डिव्हिजनच्या पॅराट्रुपर्सला पकडण्‍यासाठी पांगवण्‍यात आले. पाकच्या हवाई दलाने भारतीय लष्‍कराचे अनेक वाहनांना लक्ष्‍य केले. 
- या दरम्यान पाकिस्तानमध्‍ये ही बातमी हवेप्रमाणे पसरली, की भारताने पाकिस्तानच्या गुप्त ऑपरेशनला तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले आहे व पाकिस्तानी जमिनीवर कमांडो पाठवले आहेत.
 
चीनकडून भारताला पत्राचा बॉम्ब-
 
-  7 सप्टेंबर रोजी चीनमध्‍ये पाकिस्तानचे राजदूतने चीनच्या तत्कालीन राष्‍ट्रपती लिऊ शाओकींची भेट घेतली व अयूब खानला पत्र दाखवत त्यांच्याकडे चीनकडून मदत मागितली. 
- लगेच दुस-या दिवशी भारतावर 'पत्र बॉम्ब'चा वर्षाव झाला. अक्साई चीन व सिक्कीममधील नियंत्रण रेषेवर सैन्य पाठवल्याचे चीनने भारतावर आरोप लावला. 
- 1962 च्या युध्‍दानंतर प्रथमच असे कथित घुसखोरी काश्‍मीरच्या परिस्थितीशी जोडले गेले.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्‍या, या युध्‍दाची सुरुवातीपासून ताश्‍कंद करारापर्यंतची कहाणी...
बातम्या आणखी आहेत...