आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाच्या आधी सेक्स, विद्यापीठातील तरूण-तरूणीला मारले 100-100 फटके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडोनेशियातील बंदा अचे येथे मशिदीबाहेर तरूणीला कोडे मारताना... - Divya Marathi
इंडोनेशियातील बंदा अचे येथे मशिदीबाहेर तरूणीला कोडे मारताना...
बंदा अचे- इंडोनेशियातील बंदा अचे येथे मशिदीबाहेर पुन्हा एकदा एका कपलला 100 कोडे मारले. त्यांना लग्नाच्या आधी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे ही शिक्षा मिळाली आहे. याशिवाय आणखी दोन पुरुष आणि एका महिलेलाही शिक्षा दिली गेली आहे. इंडोनेशियातील बंदा अचे येथे शरिया कायदा लागू आहे. त्यानुसार, लग्नाच्या आधी तरूण-तरूणी यांनी शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरवला जातो. कोडे खात असताना विवळत होती तरूणी...
- दोन महिला पोलिस अधिकारी या तरूणीला मशिदीबाहेर घेऊन आली तेथे तिला 100 कोडे (फटके) मारले गेले.
- मशिदीबाहेर गर्दीत स्टेजवर तरूणीला गुडघ्यावर बसायला सांगितले तसेच दोन्ही हात वर करायला सांगितले.
- कोडे खात असताना तरूणीला वेदना होत होत्या. त्यामुळे ती विवळत होती. मात्र, तरीही तिला फटके मारणे सुरुच राहिले.
- तरूणीला 100 फटके मारल्यानंतर त्याच ठिकणी तिच्याशी संबंध ठेवणा-या प्रियकरालाही त्याच लाठीने 100 फटके मारले.
- शिक्षा झालेले तरूण-तरूणी विद्यापीठातील विद्यार्थी आहेत.
- याशिवाय एक महिला आणि पुरुषाला लग्नाशिवाय एकत्र वेळ घालविल्याने 7-7 फटके मारले गेले.
- याशिवाय आणखी एका व्यक्तीला लग्नानंतरही एका पर स्त्रीसोबत संबंध ठेवल्याने 22 कोडे मारले गेले.
- मात्र, त्या महिलेला प्रेग्नंट असल्या कारणाने शिक्षा दिली नाही. मात्र तिला डिलिवरीनंतर कोडे मारले जातील.
- सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियातील बंदा अचे प्रांतात शरीया कायदा लागू आहे.
- शरीया कायद्यानुसार, लग्नाच्या आधी तरूण-तरूणींनी सेक्स करणे गुन्हा मानला जातो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...