आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे 2-3 वर्षाची लहान मुलेही ओढतात सिगारेट, आई- वडिलांना नसतो आक्षेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्तात पब्लिक बसमधून जाताना सिगरेट पिताना मुले.... - Divya Marathi
जकार्तात पब्लिक बसमधून जाताना सिगरेट पिताना मुले....
इंटरनॅशनल डेस्क- पश्चिमी देशांत धूम्रपान करणा-या लोकांची संख्या एकीकडे घटत आहे तर दुसरीकडे इंडोनेशियासारख्या देशात मोठी वाढ होत आहे. इंडोनेशियात 60 टक्के पुरुष नियमित धूम्रपान आणि तंबाखूचा वापर करतात. यात 2 ते 8 वर्षे वयाची लहान मुलीने ओढली गेली आहेत. यावर आधारित कॅनडाच्या एका फोटोग्राफरने एक डॉक्युमेंट्री बनविली आहे. मिशेलच्या म्हणण्यानुसार, धूम्रपान जणू काही इंडोनेशियाची संस्कृतीच बनली आहे. तंबाखू अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग.....
 
- तंबाखूचा वापर जणू काही इंडोनेशियाची संस्कृती, राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा भाग बनला आहे.  
- येथे प्रत्येक 10 पावलावर तुम्हाला धूम्रपान करणारे लोक आणि तंबाखूची जाहिरात पाहायला मिळेल.
- येथील 10 पैकी 3 घरे बीडी-सिगरेट बनविण्याच्या व्यवसायात जोडली आहेत.
- इंडोनेशियाची अर्थव्यवस्था तंबाखू इंडस्ट्रीवर निर्भर आहे ज्यातून मोठा फायदा होतो. 
- येथील एक मोठा वर्ग आपले जीवन तंबाखूची शेती करून चालवतो आणि आपले लहानपण सिगरेटच्या धुरात घालवतो. 
- धूम्रपानाबाबत तेथे नियम जगापेक्षा फारच वेगळे आहेत. सार्वजनिक ठिकाणी किंवा शाळेत मुले सिगरेट ओढताना सहज दिसून येतात.
 
2 ते 8 वर्षाची मुलेही घेतात कश-
 
- येथील सरकारला तंबाखू इंडस्ट्रीचे नियंत्रण सोपे नाही. कारण तसेच केल्यास कमाईचे मोठे साधन बंद होईल. 
- मिशेलने सांगितले की, आता तेथे अशी स्थिती आहे की, हे धूम्रपान तेथील लोकांसाठी आणि संस्कृतीसाठी धोका ठरू लागले आहे. 
- याचे बळी मुलेही पडत चालली आहेत व त्याचे बालपण व निरागसपणा हरवला आहे. ते प्रौढ लोकांसारखी सिगरेट पितात. 
- यातील दोन ते 8 वर्षे वयाची मुलांचाही समावेश आहे. जे दिवसभरात सिगरेटची दोन दोन पाकिटे संपवितात.
- धक्कादायक बाब म्हणजे ही मुले आपल्या आई-वडिलांसमवेत हे सर्व करतात आणि त्यांचे पालक त्यांना रोखत नाहीत की त्यांना काहीही आक्षेप नसतो.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, काही लहान मुलांची उदाहरणादाखल माहिती व त्याचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...