आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान एअरलाईनने प्रवाशांना उतरवले भररस्त्यात, सांगितले, आता बसने जा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानात शनिवारी विमान प्रवाशांना विचित्र परिस्थतीला सामोरे जावे लागले. पाकिस्तानातील सरकारी विमान कंपनीने विमानतळ येण्यापूर्वीच विमान रस्त्यात थांबविले. त्यानंतर पुढील प्रवास बसने करण्यास सांगितले. प्रकरण असे आहे की, पाकिस्तानच्या बऱ्याच भागात मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धुके पसरलेले आहे. धुक्यांमुळे वेगवेगळ्या घटनांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
प्रवासी उतरले नाही, मग केला एसी बंद...
 
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमान कंपनीचे विमान अबुधाबी येथून पाकिस्तानकडे झेपावले. मात्र कमी व्हिजीबलिटीमुळे विमान लाहोरच्या विमानतळावर थांबविण्यात आले. जिओ न्यूजने सांगितले की, विमान कंपनीने प्रवाशांना पुढील प्रवास बसने करण्यास सांगितले. मात्र प्रवाशांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर विमान कर्मचाऱ्यांनी एअर कंडीशनर बंद करून ठेवला. अखेरीस प्रवाशांनी शरणागती पत्करली. लाहोरपासून रहीम यार खानचे अंतर 624.5 किलोमीटर एवढे आहे. 
बातम्या आणखी आहेत...