आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आेसामा बिन लादेन काश्मीरसह हेडली प्रकरणावर ठेवायचा लक्ष; सीअायएने केले दस्ताऐवज जारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाॅशिंग्टन- काश्मीर मुद्द्यासह २००८मधील मंुबई हल्ल्यातील मुख्य अाराेपी पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड काेलमन हेडलीच्या प्रकरणाचा अल-कायदाचा संस्थापक अाेसामा बिन लादेन हा सातत्याने पाठपुरावा करायचा, असे काही कागदपत्रांवरून स्पष्ट झाले अाहे. मे २०११मध्ये अमेरिकेच्या सैन्याने अबाेटाबादमधील अाेसामा बिन लादेनच्या ठिकाणावर हल्ला करून त्याला यमसदनी धाडले हाेते. त्यानंतर केलेल्या तपासात सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीअायए)च्या हाती सुमारे पावणेपाच लाख फाइल्स लागल्या हाेत्या.    त्यापैकी ४.७ लाख दस्तऐवज गुरूवारी उघड केले. 

या फाइल्समध्ये लादेनच्या मुलाच्या विवाहाशी संबंधित काही व्हिडिअाे, डायऱ्या अादींचा समावेश अाहे. त्यात भारतातील काही प्रमुख प्रकाशन संस्थांचे प्रकाशित साहित्य, लष्कर-ए-ताेयबाचे संचलन करणाऱ्या हेडलीशी निगडित विविध वृत्तपत्रांतील बातम्यांचाही प्रामुख्याने समावेश अाहे. लादेन या बातम्या व इतर साहित्य विशेष रुची दाखवत वाचायचा, असे या कागदपत्रांतून स्पष्ट झाले अाहे. यासह लादेनच्या एका संगणकात ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये १६ नाेव्हेंबर २००९ रोजी प्रकाशित झालेला एक लेखदेखील अाढळून अाला. हा लेख हेडली, पाकचा इलियास काश्मिरी यांच्यावर हाेता. याशिवाय श्रीलंकेतील ‘गार्डियन’मध्ये ‘फिअर्स अाॅफ एअरबाेर्न टेररिस्ट‌्स स्ट्राइक इन इंडिया, यूके’ या शीर्षकाने प्रकाशित झालेला एक लेखही त्याच्या संगणकात हाेता. त्याचप्रमाणे ९ फेब्रुवारी २०१० रोजी प्रकाशित झालेला प्रेस ट्रस्ट अाॅफ इंडियाचा लेखदेखील हाेता. यासह इतर साहित्यात हेडली व हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी यांच्यात हाेणाऱ्या सांकेतिक भाषेतील संवादाचा व्हिडिअाे असून, याबाबत ‘टाइम्स अाॅफ इंडिया’त १५ नाेव्हेंबर २००९ राेजी एक बातमी प्रकाशित झाली हाेती. अशा प्रकारे लादेनने हेडलीसह पाकशी संबंधित अनेक बातम्या व लेख अापल्या संगणकात साठवून ठेवल्या हाेत्या.     
 
 
अमेरिकेने २० सक्रिय अतिरेकी गटांची नावे पाककडे 
अमेरिकेने २० दहशतवादी संघटनांच्या नावाची यादी पाकिस्तानला दिली आहे. यात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए -मोहंमद, हरकत-उल - मुजाहिदीन या नावांचाही समावेश आहे. या संघटनांची मुख्यालये पाकिस्तानच्या भूमीतून सूत्रे हलवत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. भारत आणि अफगाणिस्तानला अस्थिर ठेवणे हे या संघटनांचे ध्येय आहे. या यादीत सर्वात पहिले नाव हक्कानी नेटवर्कचे आहे. वायव्य पाकिस्तानात या संघटनेचा तळ आहे. अफगाणिस्तानात होणाऱ्या हल्ल्यांची योजना येथे तयार केली जाते.  
 
काश्मीरमधील विविध घडामाेडींमध्ये दाखवायचा रुची   
या सर्व कागदपत्रे, साहित्य, सीडीज व व्हिडिअाेंवरून लादेन काश्मिरात घडणाऱ्या दहशतवादी कारवायांसह विविध घडामाेडींवर बारीक लक्ष ठेवत असल्याचे उघडकीस अाले अाहे. सर्व साहित्यात १८ हजार फायली, ७९ हजार अाॅडिअाे व इतर छायाचित्रे अादींचा समावेश अाहे. अमेरिकन नागरिकांना दहशतवादी संघटनांचे कामकाज कसे चालते याची माहिती मिळावी व यापुढे त्यांनी सतर्क राहावे म्हणून ही कागदपत्रे खुली केली असल्याचे हे सर्व साहित्य जाहीर करणाऱ्या सीअायएचे संचालक माइक पाेम्पेअाे यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...