आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसा आणि दहशतवादापासून अशी दूर आहे अफगानिस्तान लोकांची LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबुलमध्ये एक कार-वॉशिंगचे काम करताना दोन व्यक्ती.... - Divya Marathi
काबुलमध्ये एक कार-वॉशिंगचे काम करताना दोन व्यक्ती....
इंटरनॅशनल डेस्क- अफगानिस्तानमधून एखादी चांगली बातमी मिळेल अशी शक्यता तशी खूप कमी असते. सामान्यपणे या देशातून ज्या काही बातम्या, घटना, माहिती बाहेर येतात त्या तशा दुखद व मानवी जीवनासाठी असह्य अशाच असतात. युद्धाने ग्रस्त व तेथील उद्धवस्त झालेले मानवी जीवन हे तर रोजच पेपर आणि टीव्हीवर दिसत असते. मात्र, या दरम्यान तुर्कीतील प्रसिद्ध फोटोग्राफर ‘मोनिक जॅक्स’ हिने काही वेगळे फोटो क्लिक करत अफगानिस्तानातील अनोखे जीवन जगासमोर सादर केले आहे. जेक्सने अफगानिस्तानाची राजधानी काबुलमध्ये एक वर्ष घालवत तेथील प्रदेशातील लोकांचे रोजचे दैनंदिन जीवनाचे काही जबरदस्त फोटोज कॅम-यात कैद केले आहेत. 2009 च्या निकालानंतर टिपलेत हे फोटोज...
 
- जेक्स 2009 मध्ये अफगानिस्तानमध्ये इलेक्शन कव्हर करायला आली होती. इलेक्शन्सनंतर जेक्सने तेथेच एक वर्ष थांबून देशभर फिरून लोकांचे रोजचे दैनंदिन आयुष्य आपल्या कॅमे-याने टिपले.
- जेक्सच्या माहितीनुसार, इलेक्शनच्या दरम्यान संपूर्ण जगाचे लक्ष अफगानिस्तानात सुरु असलेल्या युद्धाकडे होते. त्यामुळे जेक्सने या दरम्यान जगाला युद्धग्रस्त भागातील आणि युद्धाने प्रभावित झालेल्या लोकांचे फोटोज दाखविण्याचे ठान मांडले.
- जेक्सने सांगितले की, हे फोटोज कॅप्चर करताना तिला काहीही त्रास झाला नाही. हे फोटोज असायनमेंटच्या शूटिंगशिवाय शहर फिरताना व वेगवेगळी माहिती घेताना टिपले गेले आहेत.
- जेक्स पुढे म्हणते की, काबुल नेहमीच एक जिंदादिल शहर राहिले आहे. येथील रस्ते नेहमी लोकांनी गच्च भरलेले असतात. येथील लोकांकडे सामान्यपणे स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक किंवा गॅस शेगडी नसते त्यामुळे ते जेवण बनविण्यासाठी लाकडाचा वापर करतात.
- हिवाळ्यात थंडीच्या काळात शेकोट्या आणि थंड हवेची झुळूकीचा संगम काही औरच असतो.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, जेक्सने टिपलेले फोटोज...
बातम्या आणखी आहेत...