आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी खूपच धोकादायक, जागतिक पातळीवर आपला देश वाळीत पडेल- पाकिस्तानी मीडिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द नेशनने पाक सरकारला इशारा देताना म्हटले आहे की, नवाजच्या पक्षाचे खासदार राणा मोहम्मद अफजल नॉन स्टेट अॅक्टर्सविरूद्ध कारवाई करण्याची मागणी सार्वजनिकरित्या जाहीर करत आहेत तर, हीच बाब मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओरडून सांगत आहेत की, पाकिस्तान दहशतवाद स्पॉन्सर करत आहे. - Divya Marathi
द नेशनने पाक सरकारला इशारा देताना म्हटले आहे की, नवाजच्या पक्षाचे खासदार राणा मोहम्मद अफजल नॉन स्टेट अॅक्टर्सविरूद्ध कारवाई करण्याची मागणी सार्वजनिकरित्या जाहीर करत आहेत तर, हीच बाब मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओरडून सांगत आहेत की, पाकिस्तान दहशतवाद स्पॉन्सर करत आहे.
इस्लामाबाद- एका आठवड्यात दुस-यांदा पाकिस्तान सरकार आणि लष्कराला जवळच्या वृत्तपत्राने इशारा दिला आहे. ‘द नेशन’ ने नरेंद्र मोदींना खूप जिद्दी असल्याचे सांगत म्हटले आहे की, "मोदींच्या व्यहरचनेमुळे आपला देश पाकिस्तान जागतिक पातळीवर वेगळा पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. मोदींनी पाकिस्तानात होणारी सार्क समिट रद्द केली. आपल्या कलाकरांना भारतात बंदी केली गेली. तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला उभे राहू देत नाहीत. द नेशनने म्हटले आहे की, अजूनही वेळ गेली नाही. नवाज सरकार आणि लष्कराने चांगले आणि वाईट दहशतवादी असा जो फरक केला जातो तो थांबवायला हवा. चीनसुद्धा आपल्या विरोधात जाऊ लागला...
- सोमवारी ‘द नेशन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात गोव्यात रविवारी पार पडलेल्या ब्रिक्स समिटचा उल्लेख केला आहे.
- यात मोदींनी लिहले आहे की, "मोदीने नाव न घेता पाकिस्तानला दहशतवादी तयार करणारा देश म्हटले आहे. विशेष म्हणजे, मोदींच्या या वक्तव्याला चीनने सहमती दाखवली आणि त्यांनीही दहशतवादविरोधात कडक धोरण अवलंबण्याचे संकेत दिले."
- लेखात पुढे म्हटले आहे की, नवी दिल्ली पाकिस्तानला जागतिक पातळीवर उघडे पाडण्याची एकही संधी सोडत नाही. त्याचे परिणामही दिसत आहेत. मोदींमुळेच नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणारी सार्क समिट रद्द केली आहे. भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार टाकला आहे. आता ही स्थिती आहे जागतिक पातळीवर मोदी पाकिस्तानला धोबीपछाड देण्याची एकही संधी सोडत नाहीत.
ना देशात कोणी ऐकते ना परदेशात-

- द नेशनने पुढे म्हटले आहे की, "पाकिस्तान फक्त अमेरिकेत बसलेल्या डिप्लोमॅट्सला आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपली देशासह परदेशातही थू थू होत आहे."
- लेखात पुढे म्हटले आहे की, "आता स्थिती अशी आली आहे की, नवाजच्या पक्षाचे खासदार राणा मोहम्मद अफजल नॉन स्टेट अॅक्टर्सविरूद्ध कारवाई करण्याची मागणी सार्वजनिकरित्या जाहीर करत आहेत तर, हीच बाब मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओरडून सांगत आहेत की, पाकिस्तान दहशतवाद स्पॉन्सर करत आहे."
- "राणाने स्पष्ट म्हटले आहे की, जेव्हा ते फ्रान्समध्ये गेले होते तेव्हा तेथील लोकांनी विचारले होते की, तुमचा देश हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांच्या प्रमुखाला का पोसत आहे?" त्याच्यावर कारवाई का केली जात नाही.
- "धक्कादायक तर हे आहे की, सरकार आणि लष्कराने दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करायची सोडून आपली ताकद मिडियावर खर्च करत आहे. पत्रकारांना देशाबाहेर जाण्यापासून रोखले जात आहे. यातून काय सिद्ध करू पाहत आहे आपण."
अजूनही वेळ आहे सुधरा-
- सरकार व लष्कराला सल्ला देताना लेखात शेवटी म्हटले आहे की, अजूनही फार काही बिघडले नाही. आपले धोरण स्वच्छ व मोकळे पाहिजे. चुकीच्या गोष्टींवर कारवाई झालीच पाहिजे. पाकिस्तानने आता हा विचार करावा की देशहिताचे काय आहे.
- "दहशतवाद संपवलाच पाहिजे. चांगला वाईट असा काही दहशतवाद नसलतो. आता सरकार व लष्कराने याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
- अमेरिका आता आपल्यावर दबाव वाढवत आहे तर चीनचे सुद्धा हेच म्हणणे आहे."
- "पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पडणे परवडणारे नाही. जर तसे काही झाले तर त्याचे परिणाम खूपच गंभीर व दुरगामी होतील."
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...