आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सार्क’ला पर्याय देण्यासाठी पाकिस्तानचा खटाटोप सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सार्क परिषदेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर करून टाकले. त्या पार्श्वभूमीवर एकाकी पडलेल्या पाकिस्तानने आता भारताशिवाय सार्कला पर्याय असलेली संघटना उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी चीन, इराण, मध्य आशियातील राष्ट्रांच्या सहभागाबाबत चाचपणी सुरू आहे.
परिषदेच्या आयोजनाची शक्यता तपासण्याचे काम सध्या पाकिस्तानने चांगलेच मनावर घेतले आहे. ‘डॉन’ने एका वरिष्ठ मुत्सद्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे, जेणेकरून भारताचा वाढता प्रभाव रोखता येऊ शकेल, असे पाकिस्तानला वाटते. आठसदस्यीय दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य परिषदेवर भारताचे नियंत्रण असल्यासारखे चित्र आहे. ही बाब पाकिस्तानला सहन होत नाही. त्यामुळेच नव्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे संसदीय शिष्टमंडळ वॉशिंग्टनहून परतले आहे. त्यांचा हा पाच दिवसांचा दौरा होता. या शिष्टमंडळाने ही कल्पना मांडली. नव्या व्यवस्थेत अफगाणिस्तान पाकिस्तानला ी सोबत करेल असे वाटत नाही. कारण अफगाण भारताला जवळचा मित्र मानत आला आहे.
पाच देश बाहेर | दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात होणाऱ्या परिषदेला हजर राहणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर इतर चार सदस्य देशांनीही त्यावर बहिष्कार घातला होता. त्यात बांगलादेश, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. मालदीव, नेपाळ, श्रीलंका यांचे पाकिस्तानसोबत संबंध आहेत.
ग्रेटर साऊथ एशियाच्या गप्पा
सार्क संघटनेमध्ये भारताचा दबदबा आहे. तुलनेने पाकिस्तानचे फारसे चालत नाही, परंतु पाकिस्तानने आता ग्रेटर साऊथ एशिया नावाची टूम काढली आहे. त्यामुळे नव्या व्यवस्थेत आपला प्रभाव राहील, असा पाकिस्तानचा होरा आहे. दुसरीकडे भारताच्या प्रदेशात वाढलेल्या प्रभावामुळे चीनही हैराण झाला आहे. म्हणूनच पाकिस्तान आणि चीन मिळून भारताचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नात असून त्यांनीच नवे खटाटोप सुरू केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...