आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी जन्मापासूनचा दिला, 20 कोटी लोक पुढे हिशेब देतील- पाक पंतप्रधान नवाझ शरीफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये गुरुवारी प्रथमच पंतप्रधान भ्रष्टाचार प्रकरणात संयुक्त चौकशी समितीसमोर (जेआयटी) हजर झाले. त्या वेळी प्रचंड सुरक्षा व्यवस्था होती. चौकशी आटोपल्यानंतर बाहेर पडताच पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले, “ मी तर जन्माच्या आधीपासून ते आतापर्यंतचा सर्व हिशेब दिला. पुढील वर्षी मोठी जेआयटी होईल, तीत २० कोटी लोक निकाल देतील.” पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकडे त्यांचा रोख होता.  
 
पनामागेट भ्रष्टाचार प्रकरणात पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने जेआयटी स्थापन केली आहे. अत्यंत मोकळ्या मूडमध्ये नवाझ शरीफ हे मोठा मुलगा हुसेन नवाझ आणि भाऊ शहाबाज शरीफ, जावई मेहमूद सफदर यांच्यासोबत न्यायिक अकादमी या जेआयटीच्या मुख्यालयात पोहोचले. तेथे त्यांच्या सुरक्षेसाठी २५०० सुरक्षा कर्मचारी तैनात होते. शरीफ कझाकिस्तानमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत सहभागी होऊन गेल्या शनिवारी परतले होते. त्या वेळी त्यांना १५ जूनला हजर राहावे, असे समन्स जेआयटीचे प्रमुख वाजिद झिया यांनी बजावले होते.  

६० दिवसांत द्यावा लागेल अहवाल
शरीफ यांच्या दोन्ही मुलांची जेआयटीने प्रदीर्घ चौकशी केली आहे. ५ मे रोजी स्थापन झालेल्या सहा सदस्यांच्या जेआयटीला ६० दिवसांत अहवाल द्यायचा आहे. पंजाबचे मुख्यमंत्री नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज यांना १७ जूनला हजर राहायचे आहे.

याआधीचे आरोप सिद्ध करू शकले नाहीत
‘विरोधकांनी माझ्याविरोधात आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. अर्थात, त्यांनी आधी केलेले आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. पुढील वर्षी जेव्हा मोठी जेआयटी बसेल तेव्हा देशाचे भले कोणी केले, हे २० कोटी लोक ठरवतील हे त्यांनी विसरू नये.
- नवाझ शरीफ, पाकिस्तानचे पंतप्रधान