आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृत अन् अवेस्ता भाषा एकसारखीच, जाणून घ्‍या भारत- इराणमध्ये काय आहे कॉमन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसापूर्वी गुजरातच्या दौ-यावर होते. या दरम्यान त्यांनी विविध विकासकामांची भूमीपूजने आणि उद्घाटने केली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरु केलेल्या काही योजनांचेही त्यांना पंतप्रधान म्हणून उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांनी एक मोठी घोषणा केली ती म्हणजे गुजरातमधील कांडला हे बंदर थेट इराणच्या चाबाहार बंदराशी जोडले जाईल. कांडला हे आशियातील उत्तम बंदर बनवू व याद्वारे हजारो नविन रोजगारही तयार होतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
 
खरं तर पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षीच इराणला भेट दिली होती. त्यावेळीही चाबाहार बंदर थेट भारताला जोडण्याबाबत त्यांनी चर्चा केली होती. गुजरातचे कांडला बंदर आणि इराणचे चाबहार बंदर यांच्यामध्ये सरळ रेषा आखली, तर त्याच्या उत्तरेला पाकिस्तानचे कराची बंदर येते आणि नवे ग्वादार बंदरही असणार आहे. ज्याची उभारणी चीन करतो आहे. चीन व पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताने ही व्यहरचना आखली आहे. सोबतच भारताला आखाती देशातून पुढे रशिया व युरोपात आपला माल निर्यात करणे सोपे जाणार आहे.
 
भारताचे आणि इराणचे पूर्वीपासून संबंध चांगले आहेत. याद्वारे दोन्ही देशांचे संबंध मजबूत होतील. तसे पाहिले तर जवळजवळ 3500 वर्षांपूर्वी दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या मागील कारण म्हणजे ब-याच गोष्‍टींमध्‍ये दोन्ही देशांत जुने कनेक्शन आहे. भारतीय आणि इराणी संस्कृती खूप जून्या आहेत. त्यांनी मानवी संस्कृतीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याबरोबरच दोन्ही देश एकाच इतिहासाचे, संस्कृतीचे आणि साहित्याचे भाग आहे.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्‍या भारत आणि इराणमधील सांस्कृतिक कनेक्शन...
बातम्या आणखी आहेत...