आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीरियानंतर आता इराकमध्ये ISIS नष्ट होण्याच्या मार्गावर, पाहा युद्धाचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराकमधील हवीजातील इसिस दहशतवाद्यांच्याविरोधात सुरु असलेली लष्करी ऑपरेशन..... - Divya Marathi
इराकमधील हवीजातील इसिस दहशतवाद्यांच्याविरोधात सुरु असलेली लष्करी ऑपरेशन.....
इंटरनॅशनल डेस्क- इराकी ज्वाईंट फोर्सेसने अखेर दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या घनघोर युद्धानंतर इसिसचा शेवटचा गड मानले जाणा-या ‘हवीजा’ वर ताबा मिळवला आहे. किरदिकच्या दक्षिण-पश्चिम स्थित या छोट्या शहरात 2014 पासून इसिसचा कब्जा होता. इसिसवर मिळवलेल्या या विजयाची घोषणा खुद्द फ्रान्स दौ-यावर गेलेले इराकी पंतप्रधान हैदर-अल-अबादी यांनी केली. या ज्वाईंट ऑपरेशनचे कमांडर अब्दुल अमीर याराल्लाह यांच्या माहितीनुसार, इराकी लष्कराने वेगवेगळ्या फोर्सेजला सोबत घेत हवीजामधील इसिसच्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सोबतच अबादी यांनी लवकरच शहराच्या आपास असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करणार असल्याचे सांगितले. इसिसच्या ताब्यातून सोडविली 98 गावे...
 
- इसिसला हाकलून दिल्यानंतर लष्कर, फेडरल पोलिस, रॅपिड रिस्पॉन्स फोर्स आणि पॉपुलर मोबिलाइजेशन फोर्सेजने मिळून संयुक्त ऑपरेशन चालवले होते. 
- कमांडर अब्दुलने सांगितले की, बुधवारी ज्वाईंट ट्रूप्सने हवीजाच्या आसपास 98 गावांतील 196 दहशतवाद्यांना ठार मारले. ज्यानंतर लष्कर हवीजात सहज पोहचू शकले. 
- हवीजावर लष्कराने कब्जा केल्यानंतर इराकमध्ये आता फक्त रवा आणि कईम शहर इसिसच्या ताब्यात राहिले आहे. लष्कराने मागील महिन्यात रवा आणि कईमच्या शेजारील शहर अन्नाह स्वंतत्र केले होते.  
- 2016 मध्येच इराकी लष्कराने अमेरिकन सेनेच्या मदतीने ज्वाईंट ऑपरेशनची घोषणा केली होती. यानंतर इसिसच्या ताब्यात भाग स्वतंत्र करणे सुरु झाले होते.
- लष्कराने या वर्षी जुलै महिन्यात मोसुल आणि ऑगस्टमध्ये तल-अफारला स्वतंत्र केले होते. हवीजातून इसिसला पिटाळून लावल्यानंतर इसिस आता इराकमधील खूप छोट्या छोट्या भागापुरता सिमीत राहिला आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हवीजातील इसिस दहशतवाद्यांच्या विरोधात लष्करी ऑपरेशनचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...