आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्त्रायल-पॅलेस्टाईनची रक्तरंजित बॉर्डर, येथे नेहमीच असा असतो माहौल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅलेस्टिनी नागरिकांना सीमेवरून हुसकावून लावताना इस्त्रायली लष्करी जवान... - Divya Marathi
पॅलेस्टिनी नागरिकांना सीमेवरून हुसकावून लावताना इस्त्रायली लष्करी जवान...
इंटरनॅशनल डेस्क- इस्त्रायलने आपल्या अधिकृत भागात आणि इजिप्तच्या सीमेवरील आपला भाग  ‘टाबा’ सीमा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करून टाकली आहे. इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन जारी करत याची घोषणा केली. आपल्याला माहित असेलच की, इस्त्रायलची सीमा लेबनान, सीरिया, जॉर्डन, पॅलेस्टाईन याशिवाय इजिप्त सुद्धा लागून आहे. हे सर्व इस्त्रायलचे शत्रू राष्ट्रे आहेत. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात तर कट्टर दुश्मनी आहे. ज्यामुळे त्यांच्यात कायम युद्धजन्य स्थिती असते. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने छुपे हल्ले केले की, इस्त्रायल पॅलेस्टाईनवर खुलेआम बॉम्बहल्ले करतो. याचा थेट फटका पॅलेस्टाईनचे सामान्य नागरिकांना बसतो. बॉर्डरवर गोळीबार ही तर सामान्य बाब आहे. 69 वर्षापासून सुरु आहे संघर्ष...
 
- सन 1948 मध्ये विभाजन झाल्यानंतर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन देश बनले. 
- इस्त्रायल स्वतंत्र देश बनताच अरब-इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरु झाले. 
- कारण अरब देशांना इस्त्रायल देशाचे अस्तित्त्व मान्य नव्हते व आजही नाही. 
- या युद्धामुळे पॅलेस्टाईनमधील लाखों लोक विस्थापित झाले. तसेच मोठा भूभाग इस्त्रायलच्या ताब्यात आला. 
- तेव्हापासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष सुरु आहे. या संघर्षात आतापर्यंत लाखो लोकांनी जीव गमवला आहे. 
-  इस्त्रायलने आपल्या संपूर्ण देशात एंटी मिसाईल डिफेन्स सिस्टिम यंत्रणा बसविली आहे. ज्यामुळे रॉकेट किंवा मिसाईल सहजपणे हल्ला करू शकत नाही.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, इस्त्रायल-पॅलेस्टाईन सीमेवर कसा असतो माहौल...
बातम्या आणखी आहेत...