आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu Kashmirs Gilgit Pakistan Vidhansabha Voting

गिलगिटमध्ये दुसऱ्यांदा मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरचा अविभाज्य भाग असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेतली जाऊ नये, अशा शब्दांत भारताने आपला आक्षेप नोंदवला होता. परंतु पाकिस्तानने मुजोरी करताना त्याकडे दुर्लक्ष करत सोमवारी स्वयंघोषित विधानसभेसाठी मतदान घेतले. सोमवारी सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली होती. पाकिस्तानने या अगोदर २००९ मध्ये स्वयंघोषित विधानसभेसाठी मतदान घेतले होते. त्यावेळीदेखील भारताने नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानात उत्तरेकडील प्रदेश अशी या भागाची आेळख होती. परंतु २००९ नंतर प्रदेशाचे नाव बदलून गिलगिट-बाल्टिस्तान असे ठेवण्यात आले होते. भारताच्या सार्वभौम प्रदेशात पाकिस्तानने केलेला हस्तक्षेप आहे. हा बेकायदा हस्तक्षेप असल्याचे भारताने म्हटले होते.

शरीफ, इम्रानच्या पक्षांचेही उमेदवार
पंतप्रधाननवाझ शरीफ यांचा पीएमएल (एन), इम्रान खानचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्याशिवाय पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांची ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग (एपीएमएल) पक्षाने १३ उमेदवार उतरवलेले आहेत.