आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात 'ज्यूं' चा झाला होता नरसंहार, 16 लाख ज्यूंना मारले होते ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यू महिलांवर मारहाण करताना सेव्हियत सैनिक.... - Divya Marathi
ज्यू महिलांवर मारहाण करताना सेव्हियत सैनिक....
इंटरनॅशनल डेस्क- रशियाचा शेजारी देश यूक्रेन 24 ऑगस्ट, 1991 रोजी सेव्हियत यूनियनपासून वेगळा झाला होता. फर्स्ट आणि सेकंड वर्ल्ड वॉर दरम्यान हा देश सेव्हियत यूनियनचा भाग होता आणि या दरम्यान येथे ज्यू समुदायाच्या लोकांचे नरसंहार करण्यात आले होते. याचा खुलासा फ्रेंच कॅथोलिक प्रीस्ट फादर पॅट्रिक डेसब्वॉईस यांनी आपल्या रिसर्चमध्ये केला होता. येथे ज्यू पुरुष, महिला आणि मुलांचे सुमारे 2000 सामूहिक दफनभूमी आहेत. ज्यांना जर्मन नाझी फौजी व त्यांच्या सहका-यांनी गोळ्या घालून मारून टाकले होते. ज्यू लोकांकडून खोदली जायची कब्र...
 
- पॅट्रिक यांच्या माहितीनुसार, अनेकदा तर ज्यू लोकांकडून कब्र खोदली जायची आणि त्यांनाच तेथे जीवंत दफन केले जायचे.
- पॅट्रिकने यूक्रेनच्या नाझी कॅम्पात त्या वेळी असलेले आपल्या आजोबाकडून युद्धातील अनुभव ऐकून घेतले होते. त्यानंतर पॅटिक यांनी हे खुलासे केले. 
- पॅट्रिकने खुलासा केला की, आपल्या मौज-मस्तीसाठी नाझी सैनिक ज्यू लोकांचे जीव घ्यायचे व ज्यू तरूणींवर बलात्कार करायचे. 
- इतिहासकार मिखेल त्यागली यांच्या माहितीनुसार, यूक्रेनमध्ये पीडित ज्यू लोकांची संख्या सुमारे 14 लाख ते 16 लाख दरम्यान आहे.
- आपल्या या संशोधनादरम्यान पॅट्रिकने यूक्रेन-पोलंडच्या सीमेवरील रावा रूस्काच्या आस-पास चार ठिकाणी दौरा केले, जेथे 15 हजार ज्यू लोकांना ठार मारले होते.  
- त्या काळातील नाझी सैनिकांच्या जुलमी अत्याचार आणि प्रचंड छळाची नंतर वयस्क लोकांनी कहाणी सांगितली होती.
- काहींनी सांगितले की, त्या काळी ज्यू समुदायातील महिलांचे भर रस्त्यात कपडे काढले जायचे आणि त्यांच्यावर अत्याचार केला जायचे. 
- एवढेच नव्हे तर दोन वर्षाच्या मुलांना देखील त्यांच्या आई-वडिलांसमोरच मारून टाकले जायचे.
- पॅट्रिक त्या काळातील नाझी सैनिकांचे जे जेल होते व जेथे त्यांचे आजोबाला ठेवले होते तेथेही जाऊन फिरून आले होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, यूक्रेनमध्ये झालेल्या ज्यूंच्या नरसंहारचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...