आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाब जिवंतच ! फरीदकोट शाळेच्या मुख्याध्यापकाचा पाक न्यायालयात जबाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावळपिंडी - २००८ मध्ये मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील आराेपी अजमल कसाब जिवंत असल्याचा जबाब तो शिकलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिला आहे. पाकमधील रावळपिंडीमधील दहशतवादविरोधी न्यायालयात मुंबई हल्ल्याची सुनावणी सुरू आहे.
त्या वेळी मुख्याध्यापक मुदस्सीर लखनी यांनी हा दावा करत गरज पडल्यास त्याला न्यायालयात हजर केले जाऊ शकते, असेही म्हटले. विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१२ मध्ये कसाबला पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आलेले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ डिसेंबरला होणार आहे.

भारताच्या तपास संस्थेला मिळालेल्या पुराव्यानुसार कसाबने फरीदकोटच्या प्राथमिक शाळेत तीन वर्षे शिक्षण घेतले होते. दरम्यान, गुरुवारी रावळपिंडी न्यायालयात या शाळेचे मुख्याध्यापक मुदस्सीर लखवी यांची साक्ष नोंदवण्यात आली. २०१४ मध्येसुद्धा लखवी यांनी कसाब जिवंत असल्याचे न्यायालयात म्हटले होते. मात्र, या हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लखवीच्या दबावाखाली त्यांनी असे म्हटल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने त्या वेळी केला होता. त्यामुळेच त्यांना बुधवारी पुन्हा न्यायालयात बोलवण्यात आले होते. रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगातील दहशतवादविरोधी न्यायालयात त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान, या वेळी भारतात फासावर लटकवण्यात आलेल्या कसाबचा कोणताही हवाला देण्यात आला नाही. विशेष म्हणजे फाशी देण्यात आलेला कसाब आणि त्यांच्या शाळेत शिकणारी व्यक्ती एकच असल्याचा उल्लेखही या वेळी करण्यात आला नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा, पाकिस्तानी नागरिक नसल्याचा आधी कांगावा