आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा अविभाज्य भाग : शरीफ, आधी काश्मिरींच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंब्याची होती भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- काश्मीरचा राग आळवता आळवता पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. हिजबुल मुजाहिदीनचा मारला गेलेला दहशतवादी बुरहान वानी हा करिश्मा असलेला नेता होता, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. इस्लामाबादमध्ये काश्मीर मुद्द्यावर आयोजित दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय संसदीय चर्चासत्राच्या उद््घाटनप्रसंगी शरीफ बोलत होते. नॅशनल असेम्ब्ली सचिवालय आणि यंग पार्लमेेंटेरियन फोरम यांनी हे चर्चासत्र आयोजित केले आहे. 
 
नवाझ शरीफ यांनी स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी काश्मिरी लोकांच्या संघर्षाबाबत त्यांची भावना आणि संकल्पाची स्तुती केली. ते म्हणाले, ‘आमचे हृदय आमच्या काश्मिरी भावांसोबत आहे. आता काश्मीर धोरणाबाबत पुरे झाले, काश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग आहे, हे जगाने आता भारताला सांगण्याची वेळ आली आहे.’  

बुरहान वानी याने काश्मीरच्या आंदोलनाला एक नवे वळण दिले, असा दावा शरीफ यांनी केला. आठ जुलैला सुरक्षा दलांकडून वानी मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये सुरू झालेल्या निदर्शनांविरोधात कारवाई केल्याबद्दल खेद व्यक्त केला. प्रत्येक पाकिस्तानी नागरिक काश्मिरींच्या आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पाठिंबा देतो, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
  
नवाझ शरीफ यांनी गेल्या वर्षी २१ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात आणि ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या संसदेत बुरहान वानीला युवा काश्मिरी आणि शहीद असे संबोधले होते. भारताने त्यावर कडक टीका केली होती.  

शरीफ यांच्या भूमिकेत असा झाला बदल  
दहशतवादी बुरहान वानीला शरीफ यांनी याआधीही अनेकदा ‘शहीद करिश्माई काश्मिरी नेता’ असे संबोधले आहे, पण आपण काश्मीरच्या स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्यांना (दहशतवाद्यांना) नैतिक, आर्थिक आणि राजनयिक मदत देत राहू, असे पाकिस्तान आजवर म्हणत असे. नवाझ शरीफ यांनी प्रथमच काश्मीरला पाकिस्तानचा अविभाज्य भाग संबोधले आहे. वास्तविकत: पाकिस्तानने बळजबरीने ताबा घेतलेल्या भागासह संपूर्ण जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.  

काश्मीर-पॅलेस्टाइन हेच मुद्दे 
- ‘काश्मीर आणि पॅलेस्टाइन हेच असे दोन मुद्दे आहेत, जे संयुक्त राष्ट्रांकडून दीर्घकाळपर्यंत सुटू शकले नाहीत’ - सरताज अजीज, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागार  

- संपूर्ण विभागात अस्थैर्य येण्याआधीच काश्मीरचा प्रश्न सुटायला हवा - सरदार अयाज सादिक, अध्यक्ष, पाकिस्तान नॅशनल असेम्ब्ली  
 
 
बातम्या आणखी आहेत...