आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kashmir With All Points Will Discuss With India, Nawaz Sharif Give Signal

भारतासोबत काश्मीरसह सर्व मुद्यांवर चर्चा, नवाज शरीफ यांचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- भारतासोबत काश्मीरसह सर्व मुद्यांवर चर्चा करणार असल्याचे संकेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिले आहेत. पाक दौ-यावर भारताच्या परराष्ट्र सचिवांचे स्वागत करणार असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे. शेजारी देशांसोबत शांततापूर्ण संबंध असावेत, अशी पाकिस्तानची भूमिका असल्याचा दावाही शरीफ यांनी केला.

कौन्सिल ऑफ पाकिस्तान न्यूजपेपर्स एडीटर्सच्या (सीपीएनई) बैठकीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना शरीफ शनिवारी बोलत होते. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर पाकिस्तानचा दौरा करणार असल्याची घोषणा शुक्रवारी झाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरीफ यांना फोन करून विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यासंदर्भात शरीफ बोलत होते. भारताने ऑगस्टमध्ये पाकिस्तानसोबतची परराष्ट्र सचिव पातळीवरची बोलणी थांबवली होती. कारण पाकच्या उच्चायुक्तांनी काश्मीरच्या फुटीरतावाद्यांसोबत चर्चा केली होती. तेव्हापासून भारत -पाक चर्चा ठप्प होती.

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी दक्षेस देशांसोबतच संबंधत दृढ करण्यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव जयशंकर दक्षेश देशांचा दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. मोदींच्या शरीफ यांच्यासोबतच्या चर्चेआधी काही तास आधी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांनी पाकच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली होती.

मोदींना बोलण्यास अमेरिकने राजी केले : सरताज अजीज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेसोबत चर्चा करण्यास अमेरिकेने राजी केल्याचा दावा पाकिस्तानी पंतप्रधानांच्या परराष्ट्र प्रकरणांचे सल्लागार सरताज अजीज यांनी केला आहे. अजीज म्हणाले की, मोदी चर्चेसाठी तयार होण्यामागे जम्मू - काश्मीरमधील अंतर्गत राजकीय परिस्थतीदेखील कारण असू शकते. श्रीनगरच्या रायझिंग काश्मीरमध्ये सरताज अजीज यांची मुलाखत प्रकाशित झाली आहे.

ही मुलाखत इस्लामाबादमध्ये घेतली होती. त्यात त्यांनी म्हटले की, अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी त्यांच्या दिल्ली दौ-यात चांगले संबंध प्रस्थापिक करण्यासाठी भारताने पाकशी चर्चा करावी, असे म्हटले होते.