आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lal Masjid Case: Arrest Warrant Issued Against Pervez Musharraf

लाल मशीद कारवाई प्रकरणी मुशर्रफ यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांच्याविरुद्ध इस्लामाबादेतील एका न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट बजावले आहे. २००७ मध्ये लाल मशिदीवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाईत मौलवी अब्दुल रशीद गाझी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले आहे.
याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्यापासून मुशर्रफ यांना सूट देण्यात यावी, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली होती. मुशर्रफ आजारी असल्यामुळे त्यांना सूट मिळावी, अशी विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. सध्या मुशर्रफ कराचीमध्ये मुलीकडे वास्तव्यास असून बुधवारी त्यांनी वैद्यकीय तपासणी केली. या परिस्थितीत ते न्यायालयात हजर राहू शकत नसल्याचे वकिलांनी सांगितले.
मात्र, ही विनंती फेटाळून अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाजिद अली खान यांनी मुशर्रफ यांनी भरलेला १ लाखांचा जातमुचलकाही रद्द ठरवला. गेल्या सुनावणीदरम्यान या जातमुचलक्यावर त्यांना सूट देण्यात आली होती. याप्रकरणी पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होत आहे.
प्रकरण काय?
२००७ मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर मुशर्रफ यांनी लष्करी कारवाई केली होती. यात मौलवी गाझी व त्यांच्या मातोश्रींचा मृत्यू झाला होता. या कारवाईचा आदेश मुशर्रफ यांनी दिला असल्याने या दोघांच्या हत्येचा आरोप मुशर्रफ यांच्यावरच ठेवण्यात आला आहे.