आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया, येथे वेश्या व्यवसाय पिढीजात 'धंदा'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- सध्या प्रत्येक शहरात रेड लाईट एरिया असतो. या एरियात बहुतांश बांगलादेश आणि नेपाळमधील तरुणी दिसून येतात. या दोन्ही देशांमध्ये गरीबीची सीमारेषा बरीच खाली आल्याने या तरुणी सहज पैशाच्या आमिषाला बळी पडतात. काही बळजबरीने या धंद्यात ढकलल्या जातात. पण त्यालाही पैसाच कारणीभुत असतो.
 
बांगलादेशात तर मोठ्या प्रमाणावर सेक्स ट्रेड चालतो. येथील काही गावांमध्ये तर हा व्यवसाय अगदी पिढीजात झालाय. काही तरुणींची आई, आजी आणि त्यांच्या आधीच्या अनेक पिढ्याही सेक्सच्या व्यवसायात असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमिवर आज आम्ही तुम्हाला बांगलादेशातील सर्वांत मोठ्या रेड लाईट एरियाची माहिती देणार आहोत. येथील अनुभवी महिलाच आता हा धंदा सांभाळतात. त्यांचीच हुकूमत येथे चालते. पण मर्जी मात्र पुरुषांची सांभाळली जाते. अगदी कॉन्डोमबाबतही.
 
पद्मा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या गावाचे नाव दौलतदिया असे आहे. गरीब बांगलादेशातील हा आणखी गरीब भाग समजला जातो. येथील गल्ल्यांमध्ये कायम ग्राहकांची वर्दळ असते. घरांच्या समोर महिला थांबून वाट बघताना दिसतात. त्यांची शोधक नजर आपले ग्राहक बरोबर हेरत असतात. सौदा ठरला. ग्राहक तयार असेल तर त्याला आत नेले जाते.
 
येथील बहुतांश वेश्या लहानपणीच या भागात आल्या. कुटुंबातील कुणीतरी त्यांना 'मॅडम'च्या हवाली केले होते. त्यानंतर मॅडमचे म्हणणे टाळणे त्यांना कधी जमलेच नाही. उलट प्रश्न करण्याची येथे कुणालाच परवानगी नाही. जवळपास सर्वच वेश्यांची हिच आपबिती आहे.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, वेश्या असतात खऱ्या प्रेमाच्या शोधात... 
बातम्या आणखी आहेत...