आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधवांच्या सुटकेसाठी भारतीय प्रयत्नांना वेग; आरोपपत्राची व निकालाची प्रत मागितली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर हायकोर्टाच्या बार असोसिएशनने वकिलांना जाधव यांच्या बाजूने खटला लढल्यास लायसेन्स रद्द करण्याचा इशारा दिला.(फाईल) - Divya Marathi
लाहोर हायकोर्टाच्या बार असोसिएशनने वकिलांना जाधव यांच्या बाजूने खटला लढल्यास लायसेन्स रद्द करण्याचा इशारा दिला.(फाईल)
इस्लामाबाद / नवी दिल्ली- भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने बजावलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर भारताने त्या देशाकडे खटल्यातील आरोपपत्राची व निकालाची प्रमाणित प्रत मागितली आहे. इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त गौतम बाम्बवले यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव तेहमिना जनजुआ यांची भेट घेतली.

पाकच्या लष्करी न्यायालयाने जाधवांना हेरगिरीच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावली. जाधवांवरील आरोपपत्र व निकालाची प्रमाणित प्रत मागितली अाहे. जाधव यांना पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षभरात भारतीय मुत्सद्द्यांशी १३ वेळा संपर्क नाकारण्यात आला. जाधवांना अपील करता यावे यासाठी तसा संपर्क साधू देण्याची विनंती पुन्हा एकदा करत आहोत, असे  बाम्बवले यांनी सांगितले.

जाधवांचे वकीलपत्र न घेण्याचा इशारा
लाहोर- जाधव यांचे वकीलपत्र न घेण्याचा इशारा लाहोर उच्च न्यायालय बार कौन्सिलने आपल्या सदस्यांना दिला आहे. जाधव यांना सेवा देणाऱ्या वकिलाचे सदस्यत्व रद्द केले जाईल,असे बार असोसिएशनचे सरचिटणीस अमेर सईद राण यांनी सांगितले. जाधव प्रकरणात सरकारने परकीय दबावाखाली येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
 
जाधव व्यापारी नाहीत - सरताज अजीज
- सरताज अजीज म्हणाले, "जाधव यांना फसवल्याचा आरोप चुकीचा आहे. ते गुप्तहेर आहेत, व्यापारी नाही. जाधव यांच्याकडे पाकला 2 पासपोर्ट सापडले आहेत.
- जाधव यांच्याकडे अजुनही पर्याय उपलब्ध आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडे ते दया याचिका करू शकतात. इंडियन नेवीमध्ये राहिलेले जाधव नंतर कथितरीत्या हेरगिरी करू लागले. कबुली जबाबात जाधव यांनी आपला गुन्हा मान्य केला असा दावा सुद्धा अजीज यांनी केला.
 
जाधव यांच्या समर्थनात अमेरिकेत आंदोलन
अमेरिकेत बलुच आंदोलकांनी पाकिस्तानात कुलभूषण यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या विरोधात निदर्शने केली. अहमद मुस्तिखान यांनी सांगितल्याप्रमाणे, आयएसआयने जाधव यांचे अपहरण केले. यानंतर दबाव आणून खोटा कबुली जबाब तयार करून घेतला. बलुचचे सर्वच नागरिक जाधव यांच्या पाठीशी आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...