आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 PHOTOS मधून पाहा, पाकिस्तानमध्‍ये कसे जगतायतं ट्रान्सजेंडर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या खैबर पख्‍तूनख्‍वा सरकारने ट्रान्सजेंडर्सच्या विकासासाठी जवळजवळ 13 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. मात्र आर्थिक मदत केल्याने त्यांच्या स्थितीत सुधारणा होईल का हा प्रश्‍न विचारला जात आहे. अनेक भागात ट्रान्सजेंडर्सवर हल्ले करण्‍यात आले आहेत. पाकिस्तानमधे या मुद्दाबाबत समाजाची मानसिकता बदलण्‍याची मागणी होत आहे. वाईट नजरेने पाहतात लोक...
- पाकिस्तानच्या प्रत्येक शहरात अनेक ट्रान्सजेंडर्स राहतात.
- लोक रोजीरोटी मिळवण्‍यासाठी या व्यवसायात उतरत आहेत.
- अनेक ट्रान्सजेंडर दुकानात काम करतात व रात्री विवाह समारंभात डान्स करतात.
- जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना दोन वेळेचे जेवण मिळण मुश्‍कील होईल.
- जेव्हा ते घराबाहेर पडतात तेव्हा लोक त्यांना वाईट नजरेने पाहतात.
सामुहिक बलात्कार व खून
- पाकमध्‍ये ट्रान्सजेंडर्सकडे नेहमी तिरस्काराने पाहिले जाते.
- गेल्या काही वर्षांमध्‍ये ट्रान्सजेंडर्सवर सामुहिक बलात्कार व त्यांचा खूनही करण्‍यात आले आहे.
- या घटनांविरोधात ट्रान्सजेंडर्सने अनेदा विरोध केला आहे.
- ब-याच दशकानंतर 2007 मध्‍ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडर्सना मान्यता दिली.

मोगल साम्राज्यात मिळायचे सन्मान
- तज्ज्ञांनुसार, मोगल साम्राज्याच्या काळात ट्रान्सजेंडर्स सैन्यात मोठ्या पदावर असायचे.
- ते लेडी रुम्सचे मॅनेजर व कोर्ट अधिकारीही पदावर होते.
- मात्र ब्रिटिश येताच यांची ग्रहमान फिरले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कशा पध्‍दतीने ट्रान्सजेंडर्स आयुष्‍य जगत आहेत...
बातम्या आणखी आहेत...