आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅनोव्हर मेळ्यात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ची जादू!, हिंजवडी IT Park मध्ये 2000 नोक-या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅनोव्हर (जर्मनी) - जर्मनीतील हॅनोव्हर येथे सुरू असलेल्या औद्योगिक प्रदर्शनात सोमवार महाराष्ट्र शायनिंग डे ठरला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एसक्यूएस कंपनीने महाराष्ट्रात विस्ताराचा निर्णय घेतला. कंपनीला पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये दोन एकर जागा देण्यात आली. यामुळे आणखी 2000 जणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

प्रदर्शनातील ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या दालनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. महाराष्ट्रात जर्मन उद्योग चांगली कामगिरी करीत असून आपण महाराष्ट्राला आवर्जून भेट द्यावी, असे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांना दिले.
उद्योगांचे स्वागतच
‘हॅनोव्हर मेसी 2015’ या उद्योग-व्यापार मेळाव्यात इंडो-डॅनिश प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक सर्व उद्योगांचे स्वागतच केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी इंडो-डॅनिश फोरमचे प्रतिनिधी अजय चौहान व जवाहरलाल माटू यांना दिले.

वेस्टाज टर्बाइनला निमंत्रण
या मेळ्यात विविध गुंतवणूक समुहांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. साेमवारी मर्सिडीजचे सीईओ, जीएसएबी इलेक्ट्रोटेक्निक, फ्लॅन्सचेनवेर्क थाई आदींसोबत बैठका झाल्या. किर्लोस्कर इंटरनॅशनल पंपचे प्रमुख संजय किर्लोस्कर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. जी अँड बी मेटल कास्टींग , इंडो-युएस एमआयएम टेक या कंपन्यांशीही चर्चा केली. वेस्टाज टर्बाइनला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले.

कंपन्या सुखावल्या
महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी या विषयावर फडणवीस म्हणाले , मर्सिडिज बेन्झला वर्षभर ज्यासाठी संघर्ष करावा लागला, त्याची पूर्तता आम्ही १५ दिवसांत केली. एका कायद्याच्या अर्थामुळे शिंडलरची गुंतवणूक खोळंबली होती. आम्ही त्यात दुरुस्ती केली.