आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NSG साठी US चा भारताला पाठिंबा, पाकचा तीळपापड, केला तीन देशांना फोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरताज अजीज - Divya Marathi
सरताज अजीज
इस्लामाबाद - एनएसजी (अणू पुरवठादार गट) सदस्यत्वासाठी अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला. त्‍यामुळे पाकिस्‍तानची आगफखड झाली. हे सदस्‍यत्‍व भारताऐवजी आपल्‍याला मिळावे, यासाठी पाकिस्‍तानच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने तीन देशांना फोन केले.
काय म्‍हटले पाकिस्‍तानने ?
भारताला जर NSG सदस्‍यत्‍व मिळाले तर दक्षिण आशियामध्‍ये अस्‍थ‍िरता निर्माण होईल, अशी भूमिका पाकिस्‍तानने घेतली. दरम्‍यान, पाकिस्‍तानचे परराष्‍ट्र विभाग सल्‍लागार सरताज अजीज यांनी तीन देशांच्‍या परराष्‍ट्र मंत्र्यांसोबत फोनवर चर्चा केली. तसेच सदस्‍यत्‍वासाठी पाकिस्‍तानला पाठिंबा द्यावा, अशी गळसुद्धा त्‍यांना घातली.
या तीन देशांशी बोलले अजीज...
> अमेरिका, स्वित्झर्लंड आणि मेक्सिकोने भारताला पाठिंबा दिल्‍याने हे सदस्‍यत्‍व मिळेल, अशा आशा पल्‍लवित झाल्‍यात.
> पाकिस्‍तानातील 'द डॉन' या वृत्‍तपत्रातील बातमीनुसार, अजीज यांनी रशिया, न्यूझिलँड आणि दक्षिण कोरियाच्‍या पररराष्‍ट्र मंत्र्यांना कॉल करून या बाबत चर्चा केली.
> सदस्‍यत्‍वासाठी पाकिस्‍तानला पाठिंबा द्यावा, अशी गळ जीज यांनी या या तीनही देशांच्‍या परराष्‍ट्र मंत्र्यांना घातली.
> पाकिस्तानच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ता यांनी 'द डॉन'ला दिलेल्‍या माहितीनुसार, "अजीज यांच्‍या या संभाषणाला पाकिस्तानचे डिप्लोमॅटिक एफर्ट मानले जाऊ शकते."

मोदी बोलले 48 देशांसोबत
NSG च्‍या सदस्‍यत्‍वासाठी भारताने 12 मे रोजी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आठवडाभराने पाकिस्‍ताननेही सदस्यत्व मागणी करणारा अर्ज दाखल केला. चीन आणि पाकने भारताला सदस्यत्व मिळू नये, यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी सध्या असलेल्या 48 सदस्य देशांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधानांनी टेलिफोनवरून पाठिंब्यासाठी प्राथमिक चर्चा केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
भारताच्‍या अर्जावर एकाही देशाचा आक्षेप नाही
भारताला एनएसजीचे (अणू पुरवठादार गट) सदस्यत्व मिळेल, हे जवळ - जवळ निश्चित झाले आहे. भारताच्या अर्जावर आक्षेप कोणत्याही राष्ट्राने आक्षेप घेतला नाही. ही बाब भारताच्‍या पथ्‍यावर पडणारी आहे. भारताच्या सहभागाला इटालनी आक्षेप घेतला होता. पण इटालीनेही भारताला पाठिंबा दिला आहे.
सदस्‍यत्‍व मिळाल्‍याने काय फायदा होणार ?
> भारताला जर एनएसजीचे (अणू पुरवठादार गट) सदस्यत्व मिळाले तर क्षेपणास्त्र निर्मितीसाठी अधिक चांगले तंत्रज्ञान मिळू शकणार आहे.
> एवढेच नाही तर भारतात बनणाऱ्या क्षेपणास्त्रांची निर्यात करण्यासाठीही या गटातील सहभाग उपयुक्त ठरणार आहे.
> त्‍यामुळे देशाच्या आर्थिक विकासात भर पडेल.
> याशिवाय अमेरिकन प्रिडॅटर्स सारखे ड्रोन भारत विकत घेऊ शकणार आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, अजीज यांच्‍या संभाषणाची पाकिस्‍तान सरकारने दिलेली प्रेसनोट... मोदींना अमेरिकेच्‍या संसदेत पाकिस्‍तानला काय इशारा दिला....
बातम्या आणखी आहेत...