आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानातील कराचीमध्‍येही धूमधडक्‍यात गणेशोत्‍सवाला सुरुवात, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची शहरातून वाजत गाजत गणेशाची मूर्ती नेताना भाविक. - Divya Marathi
कराची शहरातून वाजत गाजत गणेशाची मूर्ती नेताना भाविक.
कराची - गुलालाची उधळण... ढोल ताशांचा निनाद... 'गणपती बाप्‍पा मोरिया, पुढच्‍या वर्षी लवकर या ! ' चा जयघोष. मोदकांचा प्रसाद... अशा धार्मिक वातावरणात पाकिस्‍तानातील कराचीमध्‍ये दीड दिवसांच्‍या गणेशोत्‍सला सुरुवात झाली. एवढ्याच जल्‍लोषात भव्‍य मिरवणूक काढून त्‍याचे आज (मंगळवार) विसर्जन केले जाणार आहे. कराची शहरात एकूण 15 सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या शिवाय येथील हिंदू कुटुंबीयांनी घरोघरीसुद्धा गणेशाची स्‍थापना केली.
मराठी भाषिकांचे दोन मंडळं
कराची शहरात 600 ते 700 मराठी भाषिक आहेत. त्‍यांनी मराठी संस्‍कृती जपण्‍यासाठी 1982 मध्‍ये महाराष्‍ट्र पंचायत नावाची संघटना स्‍थापन केली. ही संघटना दरवर्षी दरवर्षी गणेशोत्‍सव साजरा करते. या संघटनेचे क्लिफ्टन परिसरात डोली खाता गणेश मठ आणि शिवमंदिर असे दोन दोन गणेश मंडळं असून, ते मानाचे आहेत. या शिवाय शहरातील मद्रास पाडा भागातही गणेश मंडळं आहेत.
फाळणीपूर्वीपासून गणेशोत्‍सव
देश फाळणीनंतरही अनेक हिंदू कुटुंब पाकिस्‍तानात राहिले. 70 वर्षांपासून त्‍यांनी आपली गणेशोत्‍सवाची परंपरा जपली आहे.
मूर्ती कुठून आणतात ?
कराचीमधील मद्रास पाड्यात अनेक मूर्तीकार आहेत. त्‍यांच्‍याकडून मंडळाच्‍या मूर्ती बनवून घेतल्‍या जातात. या शियाय काही जण घरगुती गणपती घरी बनवतात.
मराठी माणसांच्‍या घरात 'सुखकर्ता दुखहर्ता'
कराचीमधील मराठी घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये 'सुखकर्ता दुखहर्ता' याच आरतीने 'श्रीं'ची पूजा केली जाते. घरांघरांत मोदकांचा प्रसाद असतो.
मुस्‍लीम बांधवही करतात सहकार्य
पाकिस्‍तानात या उत्‍सवासाठी हिंदू बांधवांना मुस्‍लीम बांधवही सहकार्य करतात. येथील सरकार हिंदूच्‍या धार्मिक भावनेआड येत नाही. महाराष्‍ट्र पंचायतीच्‍या गणेशोत्‍सवासाठी मराठी कुटुंबीयांकडून वर्गणी जमा केली जाते, हे दोन दिवस आमच्‍यासाठी आनंदाचे असतात, अशी माहिती महाराष्‍ट्र पंचायतीचे विशाल राजपुत यांनी दिली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कराचीमधील गणेश मंडळाचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...