आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : पाकिस्‍तानी पायलटने विमानातच लावले 'अफगान जलेबी...' वर ठुमके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहौर - पाकिस्तानच्‍या दोन पायलटचा कॉकपिटमधील (विमानात पायलटची जागा) एक व्‍हीडियो सामोर आला आहे ज्‍यात ते बॉलीवुड गीत 'अफगान जलेबी...'वर ठुमके लावताना दिसत आहेत. त्‍यामुळे या पायटलच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत. हे गीत 'फॅन्टम' चित्रपटातील असून, त्‍यावर पाकिस्‍तानात बंदी आणावी, अशी मागणी लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हाफिज सईद याने केली होती. 26/11 च्‍या मुंबई हल्‍ल्‍यावर हा चित्रपट आधारित आहे.
काय आहे व्‍ह‍िडिओमध्‍ये ?
> 53 सेकंदाच्‍या या व्‍ह‍िडिओ क्लिपची सुरुआत एका पॅसेंजर जेटच्‍या कॉकपिटमधून होते.
> कॉकपिटमध्‍ये पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंसचे दोन पायलट दिसत आहेत. यात ते फँटमचे 'अफगान जलेबी...' या गाण्‍यावर नाचत आहेत.
> पाक मीडिया समा टीव्‍हीनुसार, या दोन्‍ही पायलटने दारू प्‍यायली होती.
का केली होती बंदीची मागणी
कबीर खान दिग्दर्शित ‘फँटम‘ चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होऊ नये, त्यावर बंदी आणावी यासाठी जमाद-उद-दावा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद याने पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्‍याने म्‍हटले होते की, मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटाच्या माध्यमातून पाकिस्तानचा अपप्रचार करण्यात आला आहे, असा युक्‍तीवाद सईदने केला होता.

पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटोज..