आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमांनी घेतली PAK PM कन्या मरियम यांची भेट, म्हणाल्या- माझे आई-वडील लाहोरचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - हार्ट ऑफ एशिया या मंत्रिस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेलेल्या भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियमची भेट घेतली. या भेटीत सुषमांनी माझे माता-पिता लाहोरचे असल्याचे मरियमला सांगितले.

काय म्हणाल्या सुषमा
- माझे आई-वडील लाहोरच्या धरमपूर येथील होते.
- मी मागील वेळी पाकिस्तानला आले होते, तेव्हा धरमपूरला भेट दिली होती. तिथे माझ्या आई-वडिलांसंबंधी अनेक आठवणी आहेत.

कुठे झाली सुषमा- मरियम यांची भेट
- मरियम शरीफ यांनी पीएम हाऊसमध्ये सुषमा स्वराज यांचे स्वागत केले.
- या भेटीदरम्यान दोघींमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली.

काय म्हणाल्या मरियम
- मरियम म्हणाल्या, 'दोन्ही देशातील लोकांना आपसात मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. सुषमा स्वराज यांचा पाकिस्तान दौरा दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास मदत करेल.'
- दोन्ही देशांनी एकत्र येऊन वादावर तोडगा काढला पाहिजे.
- जगातील इतर देश विकासाच्या यात्रेत पुढे निघाले आहेत. भारत-पाकिस्तानने आता याबद्दल विचार केला पाहिजे.

अतिरेक्यांना नंदनवन नको, सर्व देशांनी दक्षता घ्यावी
हार्ट ऑफ एशिया या मंत्रिस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठावरून सुषमा स्वराज यांनी बुधवारी भाषण केले. अफगाणिस्तानातील दहशतवादासंबंधीच्या स्थितीचा आढावा यानिमित्ताने घेण्यात येत आहे. अफगाणिस्तानच्या एकता, सुरक्षेचे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सातत्याने समर्थन होणे गरजेचे आहे. अफगाणसोबत काम करण्याची भारताची तयारी आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण क्षमतावाढीसाठी भारत सदैव सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले; परंतु दहशतवादी भूभाग मिळवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. दहशतवाद्यांच्या या धोरणात काहीही बदल झालेला नाही. त्यांना स्थान मिळणार नाही यासाठी आपण सर्वांनी खबरदार राहिले पाहिजे. दहशतवादी सुरक्षित अशा नंदनवनाच्या शोधात असतात. तेथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. तत्पूर्वी हार्ट ऑफ एशिया परिषदेचे उद्घाटन बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते झाले.
तीव्रता, व्याप्तीत वाढ : गेल्या काही महिन्यांत अफगाणिस्तानातील दहशतवादाची तीव्रता आणि व्याप्ती वाढल्याचे दिसून आले आहे. त्यातच भूप्रदेशांवर ताबा मिळवण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यांनी हे धोरण अद्यापही बदललेले नाही.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मरियम-स्वराज यांच्या भेटीचे फोटो..