आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये अपहरण झालेल्या महिला पत्रकाराची 2 वर्षांनंतर सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झीनतची सुटका अफगाणिस्तान सीमेवरून करण्यात आली आहे. - Divya Marathi
झीनतची सुटका अफगाणिस्तान सीमेवरून करण्यात आली आहे.
लाहोर- पाकिस्तानात कथित अपहरण झालेल्या महिला पत्रकाराची अखेर दोन वर्षांनंतर सुटका झाली. भारतीय अभियंत्याच्या प्रकरणाचे वृत्तांकन करणाऱ्या या महिला पत्रकाराचे अपहरण झाले होते.  

झीनत शहजादी (२६) असे त्यांचे नाव असून दैनिक नई खबरच्या त्या पत्रकार आहेत. १९ ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांचे अपहरण झाले होते. त्या कार्यालयाकडे जात असताना काही अज्ञात लोकांनी त्यांना बळजबरीने ऑटोमध्ये बसवले. हे अपहरण लाहोरमधील चांगल्या लोकवस्तीमधून झाले होते. भारतीय नागरिक हमीद अन्सारी यांच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न झीनत करत होती. नोव्हेंबर २०१२ मध्ये अन्सारी बेपत्ता झाले होते. अन्सारी मूळचे मुंबईचे आहेत. २०१२ मध्ये अफगाणिस्तानातून पाकिस्तानात घुसखोरी केल्याचा ठपका ठेवून त्यांना अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन मैत्री झालेल्या एका मुलीला भेटण्यासाठी अन्सारीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.  
 
बेपत्ता झाल्यासंबंधीच्या चौकशी आयोगाने शहजादी यांची सुटका करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यांची पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरून गुरुवारी रात्री उशिरा सुटका करण्यात आली. अपहरणामागे परदेशी शक्तींचा हात असल्याचा दावा आयोगाचे जावेद इक्बाल यांनी केला. 
 
झीनत कुटुंबात  
सुटका झाल्यानंतर झीनत शनिवारी पुन्हा कुटुंबाला भेटल्या. त्यांचे कुटुंब लाहोरमध्ये आहे. ती सुखरूप घरी परतली आहे. ही गोष्ट माझ्यासाठी मला थरारक वाटते, असे सामाजिक कार्यकर्त्या बीना सरवार यांनी म्हटले आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...