आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Received Like A Star In The Us Pakistani Daily

मोदी US मध्‍ये स्‍टार अन् आमचे PM दिसतही नाहीत - पाकिस्तानी मीडिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्‍लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अमेरिका दौ-यावर पाकिस्‍तानी मीडियाने भाष्‍य केले आहे. पंतप्रधान मोदींना अमेरिकेत जोरदार प्रसिद्धी मिळत असून एखाद्या स्‍टार प्रमाणे त्‍यांचे स्‍वागत होत आहे, असे पाक मीडियाने म्‍हटले आहे. 'द नेशन' या वृत्‍तपत्राने संपादकीय लेखात लिहीले की, त्‍या तुलनेत पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्‍या मागे कोणीच दिसत नाही. नवाज शरीफ तेथे नेमके काय करत आहेत? पाकिस्‍तानने मोदीकडून धडा घ्‍यायला हवा, असेही 'द नेशन'ने म्‍हटले आहे.

यामुळे पाक मिडीयाने केली असावी टिप्‍पणी?
अॅप्‍पलचे टिम कुक, फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गूगलचे सुंदर पिचाई यासह अनेक नामवंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्‍यांच्‍याशी संवाद साधला. मीडिया इंडस्ट्रीजचे 12 आणि विविध वित्‍तीय कंपन्‍यांचे 8 सीईओ त्‍यांना भेटले. फेसबुक आणि गुगलच्‍या ऑफीसमध्‍ये झालेला त्‍यांचा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे.
नवाज यांना कोण भेटले
दुसरीकडे नवाज शरीफ यांची केवळ मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स आणि टेलिनॉरचे सीईओ फ्रेडरिक बॅकसास यांनीच भेट घेतली. या शिवाय त्‍यांनी युनायटेड नेशन्स सरचिटणीस, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष एम श्रीसेना यांची भेट घेतली.
मोदींबाबत ‘द नेशन’ काय लिहीले ?
या वृत्‍तपत्राने संपादकीय लेखात लिहीले की, “मोदी तल्‍लख बुद्धीमत्‍ता असलेले पंतप्रधान आहेत. ते समोरच्‍या व्‍यक्‍तीवर सहज प्रभुत्‍व मिळवतात. मोदींना अमेरिकेत एखाद्या स्‍टार सारखी वागणूक मिळत आहे. जगातल्‍या टॉप कंपनींच्‍या सिईओंना ते भेटले. फेसबुकच्‍या ऑफीसमध्‍येही त्‍यांनी लोकांशी संवाद साधला. मोठमोठ्या कंपन्‍यांच्‍या सीईओंना मोदी भेटले ते भारतातीलच आहेत. भारताच्‍या विकासासाठी त्‍यांनी या लोकांना मदतही मागितली आहे. ’’
कोणी शरीफ यांच्‍याकडे पाहिलेही नाही
‘द नेशन’वृत्‍तपत्राने लिहीले, “सर्व लोक दोन्‍ही देशातील पंतप्रधानांमधील स्‍पर्धा पाहत आहेत. पण नवाज शरीफ यांच्‍या मागे कोणीच दिसले नाही. मोंदीना स्‍टार सारखी वागणूक मिळते आणि आमचे पंतप्रधान कुठेच दिसत नाहीत. शेवटी नवाज तेथे काय करत आहेत ? पाकिस्‍तानकडे जगाला देण्‍यासाठी काहीच नाही हे या दौ-यावरून लक्षात आले. त्‍यामुळे पाकिस्तानने मोदींकडून शिकायला हवे. आपण आजही जुन्‍याच मार्गाने चालत आहे. मात्र, मोदींचे तसे नाही ते बदलत्‍या वेळाचे महत्‍त्व चांगल्‍या प्रकारे समजू शकतात.”
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पाकिस्‍तानी वर्तमानपत्राने काय लिहीले..