आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या \'त्या\' बॉम्बहल्ल्याने पाकमध्येही नुकसान; घरे, मशीदींच्या भिंतींना तडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेने इसिसला लक्ष्य करून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर एमओएबी टाकला. - Divya Marathi
अमेरिकेने इसिसला लक्ष्य करून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर एमओएबी टाकला.
इस्लामाबाद - अमेरिकेने अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेजवळ इसिसच्या भुइगत ठिकाणांना लक्ष्य करून टाकलेल्या मदर ऑफ ऑल बॉम्ब (एमओएबी) मुळे पाकिस्तानात सुद्धा वित्तीय हानीची नोंद झाली आहे. एका पाकिस्तानी दैनिकाच्या वृत्तानुसार, त्या बॉम्बहल्ल्याने खुर्रम एजंसी या दुरस्थ भागात अनेक घरे आणि मशीदींच्या भिंतींना तडे गेले आहेत. एमओएबी अण्वस्त्र विरहित जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब आहे.
 
पाकिस्तानी दैनिक डॉनने रविवारी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने इसिसच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करून अफगाणिस्तानच्या नंगरहार आणि पाकिस्तानच्या खुर्रम एजंसी नजीकच्या सीमेवर एमओएबी टाकला. यात खुर्रम एजंसी परिसरात अनेक घरांना मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. याच परिसरात काही मशीदींच्या भिंतींना सुद्धा तडे गेले. 
 
 
इसिसचे 90 दहशतवादी ठार
प्राथमिक स्वरुपात आलेल्या वृत्तांनुसार, अमेरिकेच्या एमओएबी हल्ल्यात 36 दहशतवादी ठार झाले होते. या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांची एकूण आकडेवारी 90 वर पोहोचली आहे. 
 
9/11 नंतरही केले होते बॉम्ब हल्ले
अमेरिकेने 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या जगातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुद्धा याच भागातील तोरा-बोरा परिसरात बॉम्ब हल्ले केले होते. त्यावेळी, अमेरिकेने अलकायदा दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले होते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...