आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Move For Hindu Marriage Act In Pakistan Parliament Board

पाकिस्तान संसदीय मंडळात हिंदू विवाह कायद्यासाठी हालचाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - १९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली. मात्र येथील अल्पसंख्य हिंदू समुदायासाठी अद्याप कोणताही विवाह कायदा अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे हिंदू विवाह नोंदणीची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया देशात नाही.

पाकिस्तानातील हिंदूंना विवाह नोंदणी लवकरच शक्य होण्याचे संकेत पाकिस्तान संसदेने दिले आहेत. यासाठी संसदीय मंडळाची स्थापना करण्यात आली असून हिंदू विवाह कायद्यावर सध्या चर्चा सुरू आहे. एकूण लोकसंख्येच्या १.६ % हिंदू समुदाय आहे. गेल्या ६७ वर्षांपासून हा समुदाय विवाह कायद्याची मागणी करत आहे. संसदेने चौधरी महंमद बशीर विर्क यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू विवाह कायदा निर्मितीसाठी मंडळ गठीत केले असल्याचे वृत्त डॉन वृत्तपत्राने प्रकाशित केले. लवकरच हिंदू मॅरेज अॅक्ट २०१४ ची अंमलबजावणी होण्याची शक्यता डॉनने वर्तवली आहे.

यासंबधीचा प्रस्ताव २०१४ मध्ये विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे रमेश लाल यांनी संसदेत मांडला होता. याच वेळी सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाचे सदस्य दर्शन यांनीही हा प्रस्ताव संसदेत ठेवला होता. यात विवाह, घटस्फोट व विवाहनोंदणी प्रमाणपत्र याविषयीच्या तरतुदी दिल्या होत्या. सध्या विरोधी पक्ष व सत्ताधा-यांमध्ये हिंदू विवाह कायद्याचे श्रेय कोणाला? यावरून नवाच वाद सुरू झाल्याचे चित्र आहे.