आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावांनी पाठवले होते 200 गुंड, AK-47 घेऊन भिडली ही मर्दानी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानची सर्वात टफ महिला म्हणूनही ओळखल्या जाणारी वदेरी नाझो धरीजो उर्फ मुख्त्यार नाजवर बनलेला चित्रपट पुढच्या वर्षी ऑस्कला जात आहे. नाझो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील काझी अहमद गावातील रहिवासी आहे. ऑगस्ट 2005 मध्ये तिची जमीन आणि घर हिसकावण्यासाठी शत्रूंनी 200 सशस्त्र हल्लेखोर पाठवले होते. तेव्हा नाझो आपल्या बहिणींसह एक-47 रायफली घेऊन त्यांच्याशी भिडली होती. ती अशी भिडली होती, की तिने आपल्या घरात एकही शत्रूला घुसणे तर दूर पाय सुद्धा ठेवू दिला नाही. तिचे धाडस पाहून शत्रूंनी पोबारा केला. नाझोच्या याच आत्मचरित्रावर हॉलिवुडने एक चित्रपट रिलीज केला. हाच चित्रपट (बायोपिक) ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आहे. 

 

वडिलांनीच दिले रायफलचे प्रशिक्षण...
> नाझोचे वडील हाजी खुदा बक्श यांनी 4 लग्न केले होते. त्यामुळेच, संपत्तीच्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता. नाझोचे भाऊ तिचे शत्रू बनले होते. 
> वडिलांच्या मृत्यूनंतर खुदाबक्श आपली सर्वात मोठी मुलगी नाझो आणि इतर मुलींसोबत राहायला आले. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर नियंत्रण मिळवले होते. ही गोष्ट मुलांना खटकली आणि भाऊ-बहिणी कट्टर शत्रू बनले.
> खुदा बख्शला तीन मुली होत्या. त्यापैकी सर्वात मोठी नाझो होती. त्यांनी नाझोसह इतर मुलींना आपल्या मुलांसारखेच ठेवले होते. त्यांना विद्यापीठात पद्वी पर्यंतचे शिक्षण दिले. एके-47 रायफल चालवणे देखील शिकवले. 


काय घडले त्या रात्री..?
> तर दुसरीकडे, आपला बाप खुदा बक्श आणि बहिणींचा काटा काढून संपत्ती हिसकावण्यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांची साथ घेतली. खुदा बक्शसोबत राहणारा एकमेव मुलाला फेक एनकाउंटरमध्ये ठार मारले. तसेच वडिल खुदा बक्शला खोट्या आरोपांत जेलमध्ये डांबले. 
> याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ऑगस्ट 2005 मध्ये शत्रू भावंडांनी रात्री नाझोच्या घरावर 200 सशस्त्र गुंड पाठवले. शत्रूंनी घराबाहेर गोळीबार करून धमकावणे सुरू केले. मात्र, नाझो घाबरवणाऱ्यांपैकी मुळीच नव्हती. 
> आपली वडिलोपार्जित जमीन कुठल्याही परिस्थितीत वाचवणार अशी शपथ घेतलेल्या नाझोने आपल्या बहिणींच्या हातात रायफली देऊन स्वतः एके-47 घेत घराबाहेर निघाली. तसेच साऱ्या बहिणींना शत्रूंवर बेछूट गोळीबार सुरू केला. आपल्याकडे गोळ्या कमी असल्याची जाणीव असतानाही ती घाबरली नाही आणि सलग गोळीबार सुरूच ठेवला. 
> इतक्या जबरदस्त प्रतिहल्ल्यास शत्रू उत्तर देऊच शकले नाही. अखेर आपल्या बंदूका देखील त्याच ठिकाणी सोडून पळ काढला. सकाळपर्यंत अख्ख्या पाकिस्तानात नाझो आणि तिच्या बहिणींच्या धाडसाचे कौतुक सुरू झाले. 


आता ऑस्करमध्ये जातेय बायोपिक
> गोळीबाराच्या 5 वर्षांनंतर नाझोने कायदेशीर लढा जिंकला आणि स्वतः त्या संपत्तीची खरी मालकीन बनली. ती आता शेती करत आहे. तिच्या गावासह आसपासच्या अनेक गावांमध्ये लोक तिचे नाव आदराने घेतात. शत्रूंनीही आपल्या कृत्यानंतर समाजात जाहीर माफी मागितली. 
> तिच्यावर 'माय प्युअर लॅन्ड' नामक हॉलिवुड सुद्धा रिलीज झाला. ब्रिटिश-पाकिस्तानी सॅम मसूद यांच्या दिग्दर्शनात बनलेला आणि अॅन्जेलिना जोलीचा प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आता ऑस्करसाठी नामांकित झाला आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज....

बातम्या आणखी आहेत...