आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकॉनॉमिक कॉरिडॉर : पाक खासदारांना चीन ईस्ट इंडिया कंपनी होण्याची भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानातून अलीकडे चीनबद्दलचे गोडवे ऐकायला मिळत होते. आता मात्र खासदारांनी इकाॅनॉमिक कॉरिडॉर आडून वसाहतवादाची शक्यता व्यक्त करून चीन आणखी एक ईस्ट इंडिया कंपनी होऊ नये याची पुरेपूर खबरदारी घेतली जावी, असा इशारा पाकिस्तानी खासदारांनी सरकारला दिला आहे.

सरकारने चीनसोबतचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प करत असताना राष्ट्रहिताचे संरक्षण करण्यात कोठेही कमी पडता कामा नये. पाकिस्तान-चीन यांच्यातील मैत्रीचा आम्हाला अभिमान वाटतो. परंतु त्याआधी राष्ट्रहित सर्वोच्च आहे, याचा विसर पडता कामा नये, असे सिनेटर ताहिर माशहादी यांनी म्हटले आहे. सिनेटच्या नियोजन आयोगाच्या स्थायी समितीचे ताहिर अध्यक्ष आहेत. संसदेतील काही खासदारांनी राष्ट्रहिताकडे कानाडोळा करून सरकारने चीनसोबतचा करार केला आहे, असा आरोप केला हाेता. त्यासंबंधीच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान ताहिर यांनी ही चिंता व्यक्त केली. विकासाला गती देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी क्षेत्राचीदेखील भरभराट होणार आहे. परंतु सीपीईसीमध्ये वीज प्रकल्पाला समाविष्ट करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रकल्पासाठी सामान्यांकडूनच निधी गोळा केला जात असल्याचाही सरकारवर आरोप आहे. परंतु सरकारने ६ हजार मेगावॅटचा प्रकल्प सीपीईसीमध्ये अंतर्भूत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

...अन् राज्यकर्ते बनले
ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिशांची व्यापारी मोहीम होती. ते भारतात व्यापारी बनून आले होते. त्यानंतर त्यांनी राज्यकर्ते होण्याइतकी मजल मारली. त्यांनी भारतात साम्राज्य निर्माण होते. फाळणीपूर्वीची परिस्थिती पाकिस्तानवर चीनच्या माध्यमातून येऊ नये, अशी मागणी पाकिस्तानच्या खासदारांनी व्यक्त केली आहे.

अनेक सदस्यांची नाराजी
चीनवर सरकारने डोळे झाकून विश्वास ठेवू नये. चीनच्या मदतीने तयार करण्यात येणाऱ्या सीपीईसी प्रकल्पातील वीजनिर्मिती सामान्यांना परवडणारी असेल का, यावरून काही खासदारांनी सरकारला विचारणा केली. चीनकडून प्रकल्पासाठी निधीचा पुरवठा केला जात आहे. नियोजन आयोगाचे सचिव युसूफ नदीम खोखार यांनीदेखील त्यावर चिंता व्यक्त केली. चीनकडून निधी घेण्याऐवजी सामान्य नागरिकांकडून प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पैसा घेण्यात आला आहे. ही बाब आपल्यासाठी घातक ठरू शकते. हा राष्ट्रीय विकास आहे की राष्ट्रीय आपत्ती, असा सवाल खासदार मशादी यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...