आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुशर्रफ यांचे ४ बंगले जप्त करण्याचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ आपणा साधेपणाचे मूर्तीमंत उदाहरण असल्याचा दावा करत असतात. भारताने त्यांना व त्यांच्या पत्नीला भेट म्हणून दिलेल्या वस्तूही त्यांनी येथील पाक दूतावासातच सोडून दिल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात त्यांनी त्यांची संपत्ती जितकी जाहीर केली होती त्यापेक्षा किती तर पट अधिक असल्याचे आढळून आले आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर पाकिस्तानच्या एका स्थानिक न्यायालयाने त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देत त्यांना फरार घोषित केले आहे.

एकट्या संरक्षण गृहनिर्माण योजनेत त्यांच्या नावावर तीन बंगले आहेत. त्यापैकी एक बंगला तर २००० चौरस मीटर क्षेत्रावर उभारण्यात आला आहे. डिफेन्स हाउसिंग प्राधिकरणानेही (डीएचए) जिल्हा व सत्र न्यायाधीशांना पत्र लिहून या संपत्तीची पुष्टी केली आहे. मुशर्रफ यांचे चार बंगले आहेत. दक्षिण कराचीमधील सत्र न्यायाधीश नजीर अमीन मेनन यांनी मुशर्रफ यांचे चारही बंगले जप्त करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय मुशर्रफांकडे लष्करी गृहनिर्माण योजनेमध्ये आणखीही दोन मालमत्ता आहेत. या मालमत्ता त्यांनी जाहीर केलेल्या नाहीत.
मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानात देशद्रोहासह इतर प्रकरणांत खटले सुरू आहेत. त्यामुळे उपचाराच्या नावावर त्यांनी देशाबाहेर पलायन केले होते. सध्या ते दुबईला वास्तव्यास अाहेत. खटल्याच्या तारखांना सातत्याने गैरहजर राहत असल्याबद्दल न्यायालयाने त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देत त्यांना फरार म्हणून घोषित केले आहे.
बातम्या आणखी आहेत...