आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुत्ताहिदा कौमीच्या चौकशीचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - कराचीसह देशात विघातक कारवाया करण्यासाठी भारताकडून अर्थ पुरवठा केल्याचा ठपका असलेल्या मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट या पक्षाच्या चौकशीचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गुरूवारी आदेश दिले.

‘पाकिस्तानच्या एमक्यूएमने भारताकडून स्वीकारलेला निधी’ नावाने मांडण्यात आलेल्या अहवालात भारतावर हा आरोप करण्यात आल्याचा दावा बीबीसीच्या वृत्तातून करण्यात आला आहे. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी हा आरोप स्वीकारला आहे. भारताकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर निधी देखील मिळतो. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री निसार अली खान यांनी पंतप्रधान शरीफ आणि परराष्ट्रमंत्री तारीक फातेमी यांची भेट घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर केला आहे. त्यानंतर शरीफ यांनी याबाबत चिंता व्यक्त केली व चौकशीचे आदेश दिले. त्यानंतरच सत्य बाहेर येईल, असे पंतप्रधानांना वाटते. पाकिस्तानने भारताला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

मीडियातून आरोप
एमक्युएमच्या विरोधात पाकिस्तानी मीडियातून अधिक आरोप झाले. त्यानंतर देशभरात यासंबंधीच्या चर्चोला उधाण आले होते. त्यावर प्राथमिक स्वरूपाचा अहवाल तयार झाला आहे. परंतु आता पूर्ण चौकशी होणार आहे.

कराचीतील बलाढ्य पक्ष
एमक्यूएम हा पाकिस्तानातील एक महत्त्वाचा पक्ष मानला जातो. संसदेत पक्षाचे २४ सदस्य आहेत. हा पक्ष मोहाजिर समुदायाला पाठिंबा देतो. हा समुदाय उर्दू भाषिक मुस्लिम समुदाय आहे. हा समुदाय १९४७ मध्ये भारतातून स्थलांतरित होऊन पाकिस्तानात स्थायिक झाला होता. परंतु समुदायाचे नेते अल्ताफ हुसैन यांनी १९९२ मध्ये ब्रिटनमध्ये पलायन केले होते.
बातम्या आणखी आहेत...