आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नसीर खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारताशी असलेल्या संबंधात कटुता वाढत असतानाच पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी खांदेपालट केली आहे. सरताज अजीज यांच्या जागी आता सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल नसीर खान जंजुआ यांच्याकडे हे पद बहाल करण्यात आले आहे. भारत विरोधी लष्करी अभियान अज्म ए नऊमध्येही जंजुआ सहभागी होते. सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करण्याची ही पाकमधील दुसरी घटना आहे. यापूर्वी पीपीपी सरकारच्या कारकीर्दीत मेजर जनरल महमूद दुर्रानी सल्लागारपदी होते.

सरताज यांची कामाप्रती एकाग्रता नसल्याने हा निर्णय लष्करप्रमुखांनी घेतल्याची चर्चा आहे. जंजुआ यांचे संपूर्ण लक्ष परराष्ट्र नीतीवरच असावे, अशी अपेक्षा लष्कर प्रमुखांनी व्यक्त केली. अद्याप जंजुआंच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा झाली नाही. दरम्यान ते पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अमेरिकेला रवाना झाले आहेत. दरम्यान, पाक लष्कराने मोदी सरकारशी वाटाघाटी करण्यावर नाराजी व्यक्त केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शरीफ यांनाही लष्कराकडून सल्ला देण्यात आला होता.
कोण आहेत जंजुआ: राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठाचे ते अध्यक्ष होते. हे देशातील सर्वात मोठे सैनिकी प्रशिक्षण केंद्र आहे. शिवाय राष्ट्रीय सुरक्षाविषयक थिंक टँक म्हणून याचे महत्त्व अधिक आहे. भारताविरोधी चालविलेल्या अज्म ए नऊ मोहिमेत सक्रिय होते.
बातम्या आणखी आहेत...