आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट: अमरनाथपेक्षा कठीण आहे या मंदिरापर्यंतचा प्रवास, मुस्लिम म्हणतात \'हज\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - अरबी समुद्राला स्पर्श करून निघणाऱ्या 150 किमी पर्यंत पसरलेला वाळवंट... शेजारी 1000 फुट पर्यंत उंच वाळवंटी पठारांमधून वाहणारी गुजराती नदी... आणि जगातील सर्वात मोठे चिखलातील ज्वालामुखी... या भयान रस्त्यावरून एकच आवाज ऐकायला मिळतो, तो म्हणजे, 'जय माता दी!' या नवरात्री निमित्त Divyamarathi.com पृथ्वीवर देवीचे पहिले स्थान मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानातील एकमेव शक्तीपीठ हिंगलाज मंदिरावर पोहोचले आहे. 
 

पाकिस्तानात नवरात्रीचा उत्सव कसा साजरा केल्या जातो हे सांगण्याच्या हेतूने आम्ही दिव्यमराठी वेबच्या वाचकांसाठी खास वार्तांकन घेऊन आलो आहोत. पाकिस्तानातील एकमेव शक्तीपीठ नेमके कसे आहे? अमरनाथ यात्रेपेक्षा हा प्रवास कठीण का मानला जातो? आणि मागच्या जन्मी केलेले पाप नष्ट करणाऱ्या या मंदिरापर्यंत कसे पोहोचता येईल? हे आम्ही सांगणार आहोत. वाचा या 2 लाख वर्षे जुन्या मंदिरावर रोहिताश्व कृष्ण मिश्रा यांचा एक्सक्लूझिव रिपोर्ट...
 
 
नवरात्रीपासून गरबा आणि कन्या भोजही...
- जगातील 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या हिंगलाज मंदिरात नवरात्रीचा जल्लोष अगदी भारतासारखाच असतो. कित्येक वेळा येथील दृश्य पाहून ते भारतातील आहे की पाकिस्तान हे समजणे कठिण काम आहे. 
- हिंगलाज मंदिर ज्या परिसरात आहे, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हिंदू राहतात. नवरात्री निमित्त या ठिकाणी 3 किमीच्या परिसरात जत्रा भरते. दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणी गरबा करतात. पूजा हवन होते, तसेच कन्या भोज देखील दिला जातो. 
 

नवरात्रीत होते वर्षभराची कमाई
- हिंगलाज मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या संख्येवरून येथे लागणाऱ्या स्टॉल आणि दुकानांच्या कमाईचा अंदाज लावला जाऊ शकतो. 9 दिवस लागणाऱ्या या जत्रेत लोक तब्बल वर्षभर चालेल एवढी कमाई करून घेतात असेही म्हटले जाते. 
- मंदिरचे मुख्य पुजारी महाराज गोपाल गिरी यांनी सांगितल्याप्रमाणे, नवरात्रीच्या वेळी मंदिरात हिंदू-मुस्लिमांमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक किंवा भेदभाव दिसून येत नाही. कित्येकवेळा पुजारी सुद्धा मुस्लिम टोपी घालून पूजा करत असल्याचे दिसून येतात. मुस्लिम बांधव सुद्धा पूजा सुरू असताना आपल्या हिंदू बंधूंसोबत आदराने उभे राहतात. मंदिराला येणाऱ्यांमध्ये बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील नागरिकांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. 
 

यामुळे मुस्लिम म्हणतात 'हज'
- दरवर्षी नवरात्रीच्या 9 पैकी 2 दिवस या ठिकाणी सर्वात मोठी गर्दी पाहायला मिळते. त्या दोन दिवसांत दररोज 10 ते 25 हजार भक्त मातेच्या दर्शनासाठी येतात. यात पाकिस्तानसह, बांगलादेशी, अमेरिकन आणि ब्रिटिशांचाही समावेश आहे. 
- हिंगलाज मंदिरास पाकिस्तानात 'नानी बीबी की हज' किंवा दर्गाह असे मानले जाते. त्यामुळे अफगाणिस्तान, इजिप्तसह इराणमधूनही लोक या मंदिरात येतात. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, 2006 मध्ये भाजपचे नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी तत्कालीन लष्करशहा मुशर्रफची विशेष परवानगी घेऊन या मंदिराचे दर्शन घेतले होते. 
 
 
भगवान शंकराची पत्नी सतीचे शिर पडल्याने बनले हिंगलाज
- हिंदू धर्म शास्त्र आणि पौराणिक कथेनुसार, सतीचे वडील दक्ष आपल्या मुलीचा विवाह भगवान शंकराशी झाल्याने नाराज होते. रागाच्या भरात त्यांनी आपल्या मुलीचा खूप अपमान केला होता. यानंतर सतीने हवनकुंडमध्ये स्वतःला आग लावून घेतली. हे पाहताच शंकर गणांनी राजा दक्षचा वध केला होता. 
- घटनेची माहिती मिळाल्यानंतर शंकर भगवान दक्षच्या घरी पोहोचले. रागात त्यांनी सतीचा मृतदहे आपल्या खांद्यावर घेतला आणि तांडव नृत्य करायला सुरुवात केली. शंकराला शांत करण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या चक्राने सतीच्या मृतदेहाचे 51 तुकडे केले. 
- हे तुकडे ज्या-ज्या ठिकाणी पडले त्या सर्व 51 ठिकाणी 51 शक्तीपीठ तयार झाले. त्यापैकीच एक भाग (शिर) किर्थर डोंगरावर पडले होते. त्याला आज हिंगलाज मंदिर म्हणून ओळखले जाते. शिर या ठिकाणी पडल्याने या शक्तीपाठाला मातेचे पहिले स्थान असेही म्हटले जाते. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, का कठीण आहे अमरनाथ यात्रेपेक्षा व आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...