आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nawaj Sharif Alleges India Spreading Terror In Pakistan

भारत पसरवतोय दहशतवाद, शरीफ यांचा आरोप; म्हणाले काश्मीर हेच प्राधान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताने देशाबाहेर केलेल्या लष्करी कारवाईमुळे खवळलेल्या पाकिस्तानेे, आम्हाला म्यानमार समजू नका अशा इशारा दिला होता. त्यानंतर आता पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतावर दहशतवाद पसरवल्याचा आरोप केला आहे. पाकच्या परराष्ट्र धोरणाबाबतच्या एका पत्रकार परिषदेत बोलताना नवाज शरीफ म्हणाले की, आमच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व करू. हा संदेश चांगल्या प्रकारे समजून घ्यावा, असा इशारा शरीफ यांनी दिला.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या नुसार, शरीफ यांचे हे वक्तव्य भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले होते. तसेच यावेळी शरीफ यांनी काश्मीर वादाचा निपटारा ही प्राथमिकता असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. भारताकडे इशारा करत त्यांनी दहशतवादासंदर्भात गंभीर आरोपही केले. बाहेरून पाठिंबा असलेल्या दहशतवादामुले पाकिस्तानला सर्वाधिक धोका असल्याचे शरीफ म्हणाले.
वृत्तपत्रामध्ये पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आणि अशांतता पसरवल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानच्या लष्कराने भारताची गुप्तचर संस्था रॉ वरही देशात अशांती पसरवल्याचा आरोप केला आहे.

भारतीय नेत्यांच्या वक्त्यांनी निराश : शरीफ
या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे प्रमुख अधिकारीही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शरीफ म्हणाले की, भारतीय नेत्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे संपूर्ण पाकिस्तान निराश आहे. परिसरात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशापासून आम्हाला दूर नेले जात असल्याचेही ते म्हणाले. शरीफ म्हणाले की, आम्हाला शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंघ हवे आहेत. पण भारतालाही तशी भूमिका घ्यावी लागेल. दोन्ही देशांत शांतता चर्चा व्हावी यासाठी झटणाऱ्यांच्या प्रयत्नांचा आदर करावा लागेल, असेही ते म्हणाले.