आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरसाठी कुर्बानी देणाऱ्यांना बकरी ईद समर्पित : नवाज शरीफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानने काश्मिर राग आळवून पुन्हा एकदा कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. यंदाची बकरी ईद ही काश्मिरमध्ये कुर्बानी देणाऱ्यांच्या नावाने समर्पित करण्यात आली आहे, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंगळवारी जाहीर केले. अगोदर पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिन देखील काश्मिरला समर्पित केला होता. एवढेच नव्हे तर २२ खासदारांना काश्मिरच्या मुद्द्यावर भारताला विरोध करण्यासाठी जगभरात पाठवले देखील होते.

शरीफ यांनी मंगळवारी ईद-उल-अजहाच्या निमित्ताने राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेश जारी केला. त्यात ते म्हणाले, आपण काश्मिरींच्या बलिदानाकडे कदापिही दुर्लक्ष करू शकत नाहीत. त्यांना बलिदानाचे फळ मिळेल. यंदाची ईद काश्मिरी जनतेने दिलेल्या सर्वाेच्च बलिदानाच्या नावाने अर्पण करतो. काश्मिरमधील जनतेच्या इच्छेनुसार या समस्येवर तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत आम्ही त्यांची बाजू स्पष्टपणे मांडत राहू.

शरीफ यांनी रायविंड येथील आपल्या निवासस्थानी कुटुंबातील सदस्यांसह मशिदीमध्ये नमाज अदा केली. ते म्हणाले, काश्मिरी जनतेने भारतातून मुक्त होण्यासाठी आपल्या तिसऱ्या पिढीचे देखील बलिदान दिले आहे. काश्मिरमधील जनता आपल्या हक्कासाठी संघर्ष करत आहे. त्यासाठी त्यांना भारताकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराचा मुकाबला करावा लागत आहे. शक्तीचा वापर करून त्यांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही.

अमेरिकेचा भारताला झटका, बलूच स्वातंत्र्याला पाठिंबा नाही
पाकिस्तानच्या अखंडत्वाला आमचा पाठिंबा आहे. स्वतंत्र बलुचिस्तानला मात्र नाही, असे अमेरिकेने मंगळवारी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी बलुचिस्तानातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सोमवारी देशाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे भारताला झटका बसला आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी आेढली री
बातम्या आणखी आहेत...