आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पनामा पेपर्स लिक प्रकरण : पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ पक्षाच्या अध्यक्षपदी शरीफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर पनामा पेपर्स लिक प्रकरणात असलेल्या दबावामुळे त्यांच्यावर सत्ता सोडण्याची वेळ आली होती. पण त्यांच्या सत्तारुढ पाकिस्तान मुस्लीम लीग -नवाझ या पक्षाने ६६ वर्षीय शरीफ यांच्यावर विश्वास दाखवत त्यांचीच पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध पुनर्निवड केल्याने नवाझ शरीफ यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. त्यांना पक्षातून कोणाचाही विरोध हा झालाच नाही. त्यांनी निवडीनंतर पाकच्या विकासाचा पक्षाचा अजेंडा असल्याचे सांगितले आहे. आणि २०१८ ची सार्वत्रिक निवडणूक आपलीच पार्टी जिंकेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांच्या सरकारने आर्थिक आघाडीवर बऱ्याच सुधारणा केल्याचेही ते म्हणाले.

माजी कसोटी क्रिकेटपटू इम्रानखान यांच्या तहेरीक -ए-इन्सान या पार्टीने शरीफ यांच्या पदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याचवेळी शरीफ यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्याने, पक्ष आणि सत्तेवर आपलीच मजबूत पकड असल्याचे नवाझ शरीफ यांनी सिध्द केले आहे. इम्रानखान यांनी नवाझ यांच्याविरोधात २ नोव्हेंबर रोजी पाकीस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये प्रचंड मोठ्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे.

यावेळी पार्टीचे वरिष्ठ नेते तसेच जुने निष्ठावंत रजा जफरुल हक यांची देखील पक्षाच्या चेअरमनपदी पुनर्निवड झाली आहे. याचप्रमाणे पक्षाचे अन्य वरीष्ठ नेते सरताझ अझीज, सर अंजाम खान याकुब खान आणि मीर चंगेझ खान मर्री यांची पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. याचप्रमाणे चौधरी जफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यीय निवडणूक समितीने ही पक्षबैठकीतील निवडप्रक्रीया पार पाडली.

मनी लाँडरिंग : विरोधकांची स्वतंत्र चौकशीची मागणी
फेरनिवडीनंतर नवाझ यांनी इम्रानखान यांच्यावर टीका केली. ते आपल्या पक्षाला उत्तर-पश्चिम प्रांतातील खैबर पख्तुनख्वा येथे कार्यकर्त्यांकडून प्रचंड समर्थन मिळत आहे. याकडे लक्ष देत नसल्याचे शरीफ म्हणाले.पनामा पेपर्सच्या अनुसार नवाझ शरीफ यांची चारही मुले मरयम, हसन आणि हुसैन यांच्या नावाने समुद्रकिनाऱ्याजवळील कंपन्या आहेत. याशिवाय शरीफ आणी त्यांच्या कुटुंबियांनी मनी लॉंडरीग प्रकरणातील सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. पण विरोधकांनी त्या घोटाळा प्रकरणाची स्वतंत्र निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...