आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्यापुढे भाषणासाठी सराव करत राहिले नवाज शरीफ... बोलण्याची संधीच दिली नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध / इस्लामाबाद / नवी दिल्ली - सौदी अरेबिया येथील समिट रविवारी संपल्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अपमानामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. या समिटसाठी नवाज शरीफ शुक्रवारी इस्लामाबाद ते रियाधला रवाना झाले होते. समिटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा उपस्थिती लावणार अशी माहिती असल्याने त्यांनी ट्रम्प यांच्या पुढे बोलण्यासाठी विमानातच भाषणाची भरपूर प्रक्टिस केली. कार्यक्रमात एक-एक करून छोट्या-छोट्या देशांच्या नेत्यांना भाषणासाठी व्यासपीठावर बोलावण्यात आले. यादी संपली, मात्र शरीफ यांच्या नावाचा उल्लेख सुद्धा करण्यात आला नाही. ते दहशतवाद पीडित राष्ट्रांवर बोलणार होते असे सुत्रांकडून समजते.
 
विरोधकांनी खिल्ली उडवली
- रियाध येथे रविवारी इस्लामिक-अमेरिकन समिट पार पडले. यात पाकिस्तानसह जगभरातील इस्लामिक राष्ट्र सहभागी झाले. राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांचा पहिलाच अरब दौरा होता. या संमेलनात दहशतवाद प्रमुख मुद्दा असणार हे अमेरिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. 
- पाकिस्तानने सौदी अरेबियाला विनंती केली होती, की ट्रम्प आणि शरीफ यांच्या द्विपक्षीय चर्चेची व्यवस्था करावी. मात्र, तसे हो शकले नाही.
- पाकिस्तानी दैनिक 'द नेशन' च्या एका वृत्तानुसार, नवाज शरीफ शुक्रवारी रियाधच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी त्यांनी फ्लाईटमध्येच भाषणाचा सराव सुरू केला. मात्र, अवघ्या छोट्या-छोट्या राष्ट्रांना संधी दिल्यानंतरही शरीफांचे नाव सुद्धा घेण्यात आले नाही. 
- पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख सध्या सौदीच्या इस्लामिक लष्करी आघाडीचे प्रमुख आहेत. सौदीत त्यांना सुद्धा बोलण्याची संधी देण्यात आली नाही. पाकिस्तानातील विरोधी पक्ष या मुद्यावरून नवाज शरीफ आणि त्यांच्या सरकारची थट्टा उडवत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...