आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात दहा दिवसांत नवे लष्करप्रमुख नियुक्त करणार, मंत्र्याची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानात लष्कर व सरकार एकत्र येऊन काम करत आहेत की दोघांत संघर्ष आहे, ही बाब येत्या १० दिवसांत स्पष्ट होणार आहे. दहा एक दिवसांत पंतप्रधान नवीन लष्कर प्रमुखांची नेमणूक करू शकतात, असे नवाझ शरीफ यांच्या सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.

लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. आपल्याला सेवा विस्तार नको, असे त्यांनी जानेवारीतच स्पष्ट केले आहे. शहरी प्रशासन मंत्री तारिक फजल चौधरी म्हणाले, सरकारने लष्कर प्रमुख पदावर कोणाची नेमणूक करावी, याबद्दलचा निर्णय घेतलेला नाही. परंतु आठवड्यात हा निर्णय होऊ शकतो. दरम्यान, लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांना फील्ड मार्शल म्हणून पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली होती.

काय सांगतो कायदा?
लष्करप्रमुखांचे नाव पंतप्रधान निश्चित करतात. निवृत्त होणारा लष्करप्रमुख आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करू शकतो. परंतु त्यासाठी पंतप्रधान बाध्य नाहीत. वरिष्ठ जनरललाच लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केले जाईल, असेदेखील कायद्यात नमूद नाही.

पंतप्रधान शरीफ यांची अडचण
पंतप्रधान पदावर असतानाच नवाझ शरीफ यांनी आतापर्यंत चार प्रमुखांची नियुक्ती केली आहे. ऑक्टोबर १९९८ मध्ये परवेझ मुशर्रफ यांना लष्करप्रमुख केले होते. १९९९ मध्ये मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये घुसखोरीची कारवाई करून भारत व पाकिस्तान यांच्यातील युद्ध छेडले होते. तेव्हा मुशर्रफ यांच्याशी मतभेद झाले होते. त्या वेळी सत्तांतर झाले होते. शरीफ यांना सौदी अरेबियात राजाश्रय घ्यावा लागला होता. ते गैरपंजाबी व्यक्तीची लष्कर प्रमुख पदावर नियुक्ती करू शकतात.लष्कराच्या बंडखोरीचा फटका पुन्हा बसू शकतो, ही भीती शरीफ यांना वाटते.

चार जनरल शर्यतीत
सध्या पाकिस्तानात सात वरिष्ठ जनरल आहेत. त्यापैकी कोणीही लष्करप्रमुख होऊ शकतो. परंतु संयुक्त राष्ट्रात लष्करी सल्लागार मसूद अहमद यांना सेवा विस्तार मिळाला आहे. जानेवारीत निवृत्ती- चीफ जनरल स्टाफ जुबेर हयात, जनरल सय्यद वाजिद हुसेन, नजीबुल्ला खान. ऑगस्टमध्ये निवृत्ती- तीन वरिष्ठ जनरल ऑगस्ट २०१७ मध्ये निवृत्त होणार आहेत. त्याशिवाय कमांडर जावेद इक्बाल अहमद, कमर जावेद बाजवा.
बातम्या आणखी आहेत...